विसापूर (सांगली) – तणनाशक फवारल्याने तीन एकर द्राक्ष बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. तासगाव विटे रस्त्यावर महादेव मळा (बोरगाव) येथे हा धक्कादायक प्रकार घडला. हातनोली येथील अर्जुन जाधव यांची ही द्राक्षबाग आहे. श्री. जाधव यांना तब्बल पंचवीस लाखांचा फटका बसला. अज्ञात व्यक्तीविरुद्ध श्री. जाधव यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
बहरलेलं पिकच केलं उद्ध्वस्त
याबाबतची माहिती अशी, की हातनोलीतील अर्जुन जाधव व व मुलगा सुधीर यांनी महादेव मळा येथे तीन एकर द्राक्ष बाग लावली आहे. अडीच एकर साधी सोनाका व अर्धा एकर सुपर सोनाका असे पीक घेतले होते.