Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 30, 2022, 6:37 AM

Maharashtra Politics | जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे आपल्या ताफ्यासह पेट्रोलिंग करत होते. २९ सप्टेंबर गुरुवारी सकाळी सोलापूर तुळजापूर मार्गावरील तुळजापूर नाक्या जवळील बपुलाखाली वाहनांची तपासणी करत थांबले होते. पोलिसांना संशय येताच त्यांनी सदर वाहन चालकाला थांबण्याचा इशारा केला.वाहन थांबताच त्याची कसून तपासणी केली,वाहनचालक सय्यद मुजावर, क्षीरसागर असे दोघे जण वाहनात बसले होते.

 

Solapur cash
सोलापूरात पोलिसांनी रोकड पकडली

हायलाइट्स:

  • नोटांनी भरलेली बॅग घेऊन जाणारे वाहन पोलिसांच्या ताब्यात
  • २९ लाख ५० हजार रुपयांची रोकड हस्तगत
सोलापूर: सोलापूर शहर पोलीस दलातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी नोटा घेऊन जाणाऱ्या वाहनास ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोलापूर तुळजापूर मार्गावर असलेल्या तुळजापूर नाक्या जवळ ब्रिज खाली गुरुवारी २९ सप्टेंबर रोजी झाली.पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत व त्यांच्या टीमने वाहनाची कसून तपासणी केली. यावेळी गाडीमध्ये २९ लाख ५० हजार रुपयांच्या नोटा सापडल्या. यानंतर पोलिसांनी पैशांसकट हे वाहन ताब्यात घेतले. पोलिसांनी वाहनातील दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून चौकशी सुरू केली आहे. याबाबत आयकर विभागाला अधिक माहिती देऊन पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पीएसआय ताकभाते यांनी दिली.
PFI Raids: सोलापुरातून NIA ने मासे तळणाऱ्या असिफ शेखला घेतले ताब्यात
जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे आपल्या ताफ्यासह पेट्रोलिंग करत होते. २९ सप्टेंबर गुरुवारी सकाळी सोलापूर तुळजापूर मार्गावरील तुळजापूर नाक्या जवळील बपुलाखाली वाहनांची तपासणी करत थांबले होते. पोलिसांना पाहून एमएच १३ डीव्ही १७८६ हे वाहन संशयितरित्या हळू पुढे सरकत होते.पोलिसांना संशय येताच त्यांनी सदर वाहन चालकाला थांबण्याचा इशारा केला.वाहन थांबताच त्याची कसून तपासणी केली,वाहनचालक सय्यद मुजावर, क्षीरसागर असे दोघे जण वाहनात बसले होते.वाहनात नोटांनी भरलेली बॅग पोलिसांना दिसली. त्या नोटाबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी वाहन पोलीस ठाणे येथे आणून चौकशी सुरू केली,रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती.
बोका हरवल्याने शहरभर पोस्टर, त्याच्या जेवणाचं भांडं वाजवलं, अखेर तीन दिवसांनंतर ट्रकखाली सापडला
सोलापुरातील एका प्रसिद्ध मेंदूरोग तज्ञाची चौकशी

वाहन चालक सय्यद मुजावर व क्षीरसागर यांनी पोलिसांना माहिती देताना सांगितले की,एका डॉक्टराची रक्कम आहे.जोडभावी पेठ पोलिसांनी संबंधित मेंदूरोग तज्ञाला बोलावून चौकशी केली आहे. हे डॉक्टर सोलापुरातील प्रसिद्ध असे मेंदूरोग तज्ञ आहेत. पोलिसांनी या पैशांबाबत त्यांना विचारणा केली. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यातील पीएसआय ताकभाते यांनी माहिती देताना सांगितले की,सदर रक्कमेबाबत आयकर विभागाला माहिती देण्यात आली आहे. ते आता खुलासा मागतील ,आणि त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी सोलापूर शहरातील वेगवेगळ्या डॉक्टरांच्या घरावर आयकर खात्याच्या धाडी पडल्या होत्या. त्यामुळे सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्र प्रसिध्द झोतात आले होते.आता या प्रकरणात पुन्हा एका डॉक्टराला बोलावून चौकशी सुरू केली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here