नागपूर: महाविकास आघाडी सरकारच्या काळात सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत.एका कार्यक्रमात त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी भाष्य केले. तेव्हा भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सचा पल्ला कसा गाठू शकते, यावर आपले मत मांडले. सध्याच्या घडीला भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, आपली अर्थव्यवस्था लवकरच पाच ट्रिलियन डॉलर्सची होईल. मला तर वाटते, तुम्ही सर्वांनी मदत, संपर्क आणि सेवा या तीन गोष्टी केल्यात तर पंतप्रधान मोदी यांना अपेक्षित असलेल्या वेळेपूर्वीच भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठेल. यात माझ्यासारखा भिकारी तर काहीच करु शकत नाही, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले. (Governor Bhagat Singh Koshyari speech in Nagpur)
शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका; राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबद्दल महत्त्वाचे आदेश
भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी नागपूरमधील सुरेश भट सभागृहात आयोजित भारत विकास परिषदेला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. भारत विकास परिषदेत देशभरातील चांगले लोक आहेत. जो चांगला वकील आहे, चांगला डॉक्टर, चांगला दुकानदार असे सर्व लोक एकत्र बसतात, योजना तयार करतात. तसेच योजना करून देशभरात सेवेचं काम करतात. आपण ते काम किती पुढे नेऊ शकतो यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मत भगतसिंह कोश्यारी यांनी मांडले. आपण जेव्हा कुटुंबाविषयी विचार करतो की, मुलाला आयएएस बनवायचं आहे, सध्या दोन कारखाने आहेत, तर १० कारखाने असावेत. जेव्हा आपण अशी इच्छा बाळगतो तेव्हा कारखानाही तयार होतो आणि मुलगा आयएएसही बनतो, असेही कोश्यारी यांनी म्हटले.

मला निवृत्ती मिळायला हवी तरीही…, राज्यपाल कोश्यारींनी मनातलं बोलून दाखवलं

गडकरी म्हणतात, मला आठ हजार रुपये द्या!

यावेळी भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एक किस्सा सांगितला. गडकरी मला नेहमी म्हणतात की, कोश्यारीजी तुम्ही मला ८ हजार रुपये द्या. मी तुम्हाला ८ लाख कोटी रुपयांची कामे करुन दाखवतो, हाच उत्कर्ष आहे. हाच विकास आहे. विकासाची कामं करायची असतील, तर त्यासाठी एक आपल्यात तशी इच्छाशक्ती असायला हवी, असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here