Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 30, 2022, 8:22 AM
Maharashtra news | शेतामध्ये गेलेले ज्ञानोबा नागरगोजे हे सकाळी घरी परत न आल्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता शिवाजी नागरगोजे यांचा मृतदेह शेतामध्ये आढळून आला. घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी घटनेची माहिती पिंपळदरी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पिंपळदरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. याप्रकरणात आता पोलीस पुढे काही कारवाई करतात का, हे पाहावे लागेल.

हायलाइट्स:
- वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पिकाच्या बाजूला तार लावून त्यामध्ये विद्युत प्रवाह सोडला होता
- पिंपळदरी पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे
दामपूर येथील शिवाजी ज्ञानोबा नागरगोजे यांच्या शेता शेजारी असलेल्या एका शेतकऱ्याने . मात्र ही बाब त्यांनी शेजारील शेतकऱ्यांना सांगितली नाही. रात्री शिवाजी नागरगोजे हे शेतामध्ये गेले. आणि विद्युत प्रवाह सोडलेल्या ताराला त्यांच्या स्पर्श झाला. त्यामुळे त्यांच्या जागीच मृत्यू झाला.
शेतामध्ये गेलेले ज्ञानोबा नागरगोजे हे सकाळी घरी परत न आल्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता शिवाजी नागरगोजे यांचा मृतदेह शेतामध्ये आढळून आला. घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी घटनेची माहिती पिंपळदरी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पिंपळदरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. मृतदेह शविच्छेदनासाठी अन्यथाला असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्या मध्ये नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पिंपळदरी पोलीस करत आहेत.
वीज दुरुस्तीसाठी खांबावर चढला अन्….
काही दिवसांपूर्वी परभणीत असाच एक प्रकार घडला होता.परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील माखणी येथे स्वरूप शिसोदे हे वीज दुरुस्तीचे काम करण्यासाठी गावापासून ३ किमी अंतरावर असलेल्या शेतामध्ये गेले होते. याचवेळी तारांमध्ये अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने त्यांना विजेचा धक्का बसला. यामध्ये शिसोदे यांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद झाली करण्यात आलेली नाही.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.