पुणे: काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकट्याच्या वाट्याला सहा जिल्हे आले होते. तेव्हा फडणवीस एकट्याने इतक्या जिल्ह्यांचा कारभार कसा पाहणार, असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थित केला होता. त्यावर फडणवीसांनीही अजितदादांना तात्काळ प्रत्युत्तर दिले होते. एकावेळी अनेक जिल्ह्यांचा कारभार कसा पाहायचा, याचा गुरुमंत्र मी अजित पवार यांना देईन, अशी खोचक टिप्पणी फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या या उपरोधिक टिप्पणीची अजित पवार यांनी सव्याज परतफेड केली आहे. ते शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लवकरच प्रशिक्षणासाठी जाणार असल्याचे म्हटले.

मी देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून विचारणार आहे की, मी तुमच्याकडे ट्रेनिंगला कधी येऊ, त्यासाठी किती फी लागेल? फडणवीस मला ही ट्रेनिंग मोफत देणार आहेत? त्यांच्याकडे जाऊन मी माझ्या ज्ञानात भर घालतो, अशी मिष्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली. अजितदादांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
Sharad Pawar: शरद पवारांनी महाराष्ट्राचा एक दौरा केल्यावर ते लगेच सत्तेवर येतात: सुप्रिया सुळे
दरम्यान, अजित पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना पीएफआय संघटनेवरील कारवाई, शेतकऱ्यांचा देण्यात आलेली आर्थिक मदत, दसरा मेळावा अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पुण्यात पीएफआय संघटनेकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे दिले की नाहीत, याचा तपास पोलीस अजून करत आहेत. याविषयी दररोज वेगवेगळी माहिती समोर येत आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

भुजबळ आणि अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर अजितदादांची सावध भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये सरस्वती देवीच्या प्रतिमेऐवजी महापुरूषांची छायाचित्रं लावावीत, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्त्वव्यावरुन वादंग झाला होता. याविषयी अजित पवार यांना विचारणा झाली असता त्यांनी म्हटले की, ते छगन भुजबळ यांचे वैयक्तिक मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तसे मत नाही. पण प्रत्येकाला त्याच्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.
आईला भेटायला जातो, पण फोटो काढत नाही; अजित पवारांचा पंतप्रधानांना अप्रत्यक्ष टोला
तर २०१४ मध्ये एकनाथ शिंदे हे अशोक चव्हाणांकडे युतीचा प्रस्ताव घेऊन आले होते, या चर्चेविषयी बोलण्यास अजित पवार यांनी नकार दिला. हे सगळे २०१४ मध्ये घडले आहे, आता आपण २०२२ मध्ये आहोत, थोड्याच दिवसांत २०२३ सुरु होईल. त्यामुळे शिळ्या कढीला ऊत आणण्यात अर्थ नाही. जनतेला या सगळ्या वादांमध्ये रस नाही. बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यावरुन लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी अशाप्रकारची वक्तव्यं केली जात असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here