Authored by सचिन जिरे | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 30, 2022, 11:05 AM

Aurangabad News : पॉलिटेक्निकचे शिक्षण घेणाऱ्या दोन जिवलग मित्र गळ्यात हात टाकून जात असताना त्यांना रेल्वेने उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघेही रेल्वे रुळाशेजारून गाणे ऐकत जात होते.

 

Aurangabad Local News
दोघंही गळ्यात हात टाकून गाणं ऐकत जात होते; मात्र क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं…

हायलाइट्स:

  • पॉलिटेक्निकचे शिक्षण घेणाऱ्या दोन जिवलग मित्रांना रेल्वेने उडवले
  • दोघेही रेल्वे रुळाशेजारुन गाणे ऐकत जात होते
  • नंदीग्राम एक्सप्रेसने दोघांना उडविल्याची घटना घडली आहे
औरंगाबाद : पॉलिटेक्निकचे शिक्षण घेणाऱ्या दोन जिवलग मित्र गळ्यात हात टाकून जात असताना त्यांना रेल्वेने उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघेही रेल्वे रुळा शेजारून गाणे ऐकत जात होते. त्याचवेळी आलेल्या नंदीग्राम एक्सप्रेसने दोघांना उडविले. रात्री १० च्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. जिवलग मित्रांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ऋषिकेश सुधाकर जाधव (वय २०) तेजस राहुल जाधव (वय १८) दोघेही रा. मुकुंदनगर, औरंगाबाद) अशी मृत्यू पावलेल्या दोन्ही मित्रांची नावे आहेत.

मिळालेल्या बातमीनुसार, तेजस हा पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षात शिकायचा तर ऋषिकेश तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. दोघेही चांगले मित्र होते. नवरात्र असल्याने दोघेही शहरात गेले होते. रात्री दहाच्या सुमारास दोघेही घरी येत असताना एकमेकांच्या गळ्यात हात टाकून गाणे ऐकत येत होते. गाणे ऐकताना ते रेल्वे रुळच्या अगदी जवळून जात होते. मात्र, त्याचवेळी धावत्या नंदीग्राम एक्सप्रेसने दोघांना धडक दिली. यात दोघांचाही मृत्यू झाला. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतांची ओळखत पटवल्यानंतर मृतदेह रुग्णालयात हलवण्यात आले.

मल्लिकार्जुन खरगेंच्या एन्ट्रीमुळं काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट, दिग्विजय सिंह माघार घेणार?
मुकुंदवाडी परिसरात असलेल्या रेल्वे रुळावर यापूर्वी देखील अनेक अपघात घडले आहेत. शिवाय या भगातील रुळावर गेल्या काही वर्षात आत्महत्या करणाऱ्यांचे देखील प्रमाण वाढले आहे. रुळाच्या दोन्ही बाजूने राहणारे नागरिक याच रुळावरून येजा करत दैनंदिन कामे करतात. त्यामुळे येत्या काळात अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Dasra Melava: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचं भाषण एकाचवेळी सुरु झाल्यास पहिलं कोणाचं भाषण ऐकाल? अजित पवार म्हणाले…

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here