today india crime news, रुग्णवाहिकेमध्ये आढळले तब्बल २५ कोटी, चौकशी केली असता पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली… – police seized more than 25 crore fake notes in surat gujrat
सुरत : गुजरातमधील सुरतमध्ये पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. येथे पोलिसांनी कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक हितेश जोयसर यांनी दिली. माहितीवर कारवाई करत सुरतच्या कामरेज पोलिसांनी अहमदाबाद-मुंबई रस्त्यावर एक रुग्णवाहिका थांबवली, असे ते म्हणाले. यानंतर पोलिसांनी रुग्णवाहिकेची झडती घेतली असता वाहनाची तपासणी केली असता सहा पेट्यांमध्ये तब्बल २५ कोटी ८० लाख रुपयांच्या २००० रुपयांच्या बनावट नोटांची १२९० पाकिटे आढळून आली. पोलिसांनी चालकाची चौकशी करुन नोटा जप्त केल्या.
एसपी ग्रामीण हितेश जोयसर यांनी पुढे माहिती दिली की, नोटा बारकाईने पाहिल्यानंतर रिझर्व्ह बँक ऐवजी रिव्हर्स बँक ऑफ इंडिया असे लिहिलेले आढळून आले. त्याचबरोबर बँक अधिकारी आणि एफएसएल टीमला पाचारण करण्यात आले आहे. तसेच गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास सुरू आहे.
हैदराबादमधील आयुक्तांच्या टास्क फोर्सने एका व्यक्तीला अटक केली आहे. ज्याच्याकडून १.२४ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याच्या काकांनी त्याला इतर चार जणांमध्ये रोख रक्कम देण्यास सांगितले होते. दुसरीकडे, व्यक्ती रोख रकमेसाठी योग्य कागदपत्रे सादर करण्यात अयशस्वी ठरली.