Patil Prashant | Maharashtra Times | Updated: Sep 30, 2022, 2:10 PM

Thane News : ठाण्यात शिंदे गटाकडून बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर शिवसेनेचे जुने वाघाचे चिन्ह वापरण्यात आलं आहे. तसेच या बॅनरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे.

 

हायलाइट्स:

  • दसरा मेळाव्यासाठी ठाण्यात शिंदे गटाकडून बॅनरबाजी
  • मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
  • वैचारिक वादातून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड पुकारला
ठाणे: सध्या महाराष्ट्रात शिंदे गट आणि ठाकरे गटात दसरा मेळाव्यावरून रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या दसरा मेळाव्यासाठी येत्या ५ ऑक्टोबरला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी ठाण्यात शिंदे गटाकडून बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर शिवसेनेचे जुने वाघाचे चिन्ह वापरण्यात आलं आहे. तसेच या बॅनरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे.

“शिवसेनेचा दसरा मेळावा, हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार”, अशा आशयाचे बॅनर ठाण्यातील कॅडबरी जंक्शन खोपट येथील उड्डाणपुलावर लावण्यात आला आहे. ‘एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ’, असं देखील बॅनरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच या बॅनरवर शिवसेनेचे जुने वाघाचे चित्र असलेले चिन्ह वापरण्यात आले असून त्यात “गर्व से कहो हम हिंदू है”, असं लिहलेलं आहे. या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांचा जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो, शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. ५ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई बीकेसी मैदान येथे पार पाडणाऱ्या दसरा मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.

Dasara Melava

रुग्णवाहिकेमध्ये आढळले तब्बल २५ कोटी, चौकशी केली असता पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली…
वैचारिक वादातून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड पुकारला आणि भाजप सोबत युती करत पुन्हा सत्ता स्थापन केली. यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाचे विचार मांडत आपण ही शिवसेना सोडली. तसेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आम्ही सुरु ठेवली आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार सोबत घेऊन आम्ही चाललो आहे. त्यामुळे आमची शिवसेना खरी असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार मांडले आहे. याच पार्श्वभूमीवर हिंदुत्वाच्या विचारांसाठी आपण दसरा मेळावा घेणार असल्याचे देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. याबाबत दादर शिवतीर्थ येथे दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी शिंदे गटाकडून न्यायालयात देखील याचिका दाखल करण्यात आली होती.

मात्र, न्यायालयाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला. तर शिंदे गटाला मुंबई येथील बीकेसी मैदान येथे परवानगी मिळाली आहे. येत्या ५ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजता शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. या दसरा मेळाव्याला हिंदुत्वाचे विचार ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यासाठी ठाण्यात शिंदे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
Nana Patole: नागपूरची हाफ चड्डी घातल्यावर स्पर्धा परीक्षा द्यावी लागत नाही, माणूस थेट जॉईंट सेक्रेटरी होतो: नाना पटोले

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here