सिंधुदुर्ग: गणेशोत्सवासाठी , तसेच राज्यातील अन्य शहरांत नोकरीनिमित्त असलेले लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील मूळगावी येत असतात. संसर्गामुळे या चाकरमान्यांपुढे यंदा मोठे विघ्न आले आहे. गणपतीला गावी जायला मिळणार की नाही, असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. त्यावर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घेतलेल्या बैठकीत उत्तर मिळाले आहे. ( )

यंदा ऑगस्ट महिन्यात आहे. २२ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. त्याअनुशंगाने जिल्ह्यात चाकरमान्यांना प्रवेश देण्याबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात सर्वात मुख्य निर्णय म्हणजे इतर जिल्ह्यांतून सिंधुदुर्गात येणाऱ्या गणेशभक्तांना ७ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंतच प्रवेश देण्यात येणार आहे. जिल्ह्यात येण्यासाठी ई-पास आवश्यक असून ई-पास नसल्यास वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.

परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना गाव नियंत्रण समितीच्या सल्ल्याने १४ दिवस क्वारंटाइन राहणे आवश्यक आहे. नागरिकांनी परजिल्ह्यातून येण्याअगोदर क्वारंटाइन राहण्यासाठी घराची क्षमता, सोयी सुविधा काय आहेत, याची खात्री करूनच जिल्ह्यात यावे. परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना १४ दिवस घराबाहेर पडता येणार नाही. त्याचवेळी परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांच्या घरातील स्थानिक सदस्यांवर घराबाहेर पडण्याकरता निर्बंध राहणार आहेत, असे या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.

रत्नागिरी बातमी | Ratnagiri News | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here