Maharashtra Osmanabad News | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उस्मानाबाद दौऱ्यावेळी घडलेला एक प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक विधवा महिला सुप्रिया सुळे यांना कुंकू लावताना दिसत आहे. वसंतराव नागदे यांच्या सूनेने सुप्रिया सुळे यांना कुंकू लावत एक नवा पायंडा घालून दिला. हा एकूणच प्रसंग अंगावर रोमांच उभे करणारा होता.

 

Supriya Sule
विधवा सुनेने सुप्रिया सुळेंना लावलं कुंकू

हायलाइट्स:

  • या व्हिडिओत एक विधवा महिला सुप्रिया सुळे यांना कुंकू लावताना दिसत आहे
  • जुनाट प्रथेला सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यावेळी मूठमाती देण्यात आली
उस्मानाबाद: देशातील सर्वात पुरोगामी आणि जुनाट, अनिष्ट प्रथांना मूठमाती देणारे आधुनिक विचारांचे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. आजपर्यंत घडलेले विविध प्रसंग आणि घटनांमधून महाराष्ट्राने वेळोवेळी आपल्या पुरोगामीपणाची प्रचिती आणून दिली आहे. याच उदात्त परंपरेला साजेसा असा प्रकार अलीकडेच उस्मानाबाद येथे पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या उस्मानाबाद दौऱ्यावेळी घडलेला एक प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक विधवा महिला सुप्रिया सुळे यांना कुंकू लावताना दिसत आहे. आजही समाजात विधवा महिलांना घर किंवा सार्वजनिक मंगल कार्यावेळी दूर ठेवले जाते. आपण विकासाच्या कितीही बाता मारल्या तरी शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये आजही काही जुनाट आणि अनिष्ट प्रथा कायम आहेत. अशाच एका जुनाट प्रथेला सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यावेळी मूठमाती देण्यात आली.
‘तिचं मंगळसूत्र काढू नका, कुंकू पुसू नका’; अंत्यविधीवेळी रुपाली चाकणकरांनी पुढाकार घेतला अन्…
सुप्रिया सुळे या उस्मानाबाद दौऱ्यावर असताना उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे (Vasantrao Nagde) यांच्या घरी गेल्या होत्या. सुप्रिया सुळे येणार असल्याने साहजिकच याठिकाणी मोठी गर्दी जमली होती. याठिकाणी वसंतराव नागदे यांची सूनही उपस्थित होती. पतीच्या अकाली निधनामुळे त्यांना वैधव्य आले. मात्र, वसंतराव नागदे यांच्या सूनेने सुप्रिया सुळे यांना कुंकू लावत एक नवा पायंडा घालून दिला. हा एकूणच प्रसंग अंगावर रोमांच उभे करणारा होता.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आयुष्यभराचा जोडीदार अचानक निघून जाण्याचं दुःख खुप मोठं आहे. पण त्यामुळे आयुष्य थांबू नये. प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचा तो भरभरुन जगण्याचा अधिकार प्रत्येक महिलेला आहे. तिच्या पाठीशी तिच्या कुटुंबियांनी ठामपणाने उभं राहिलं पाहिजे. उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांच्या घरी भेट दिली, तेंव्हा वसंतरावांचा हा एक वेगळाच पैलू पहायला मिळाला. त्यांच्या मुलाचं नुकतंच निधन झाले. मुलाच्या निधनाचं दुःख पचवून ते सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत. त्यांनी सुनेच्या हातून आम्हा सर्वांचे स्वागत केले. स्वागताचे कुंकू लावताना सुनबाईंचा हात थरथरला पण वसंतरावांनी तिला धीर दिला. हा सगळा प्रसंग अतिशय भावूक करणारा,नवी दिशा देणारा आणि आश्वासक असा होता.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here