काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आज शुक्रवारी सकाळी भीषण मोठा स्फोट झाला असून त्यात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २७ जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. तालिबानचे खालिद झदरान यांनी सांगितलं की, आज सकाळी दश्ती बर्ची भागात स्फोट झाला. अफगाणिस्तानील अल्पसंख्याक शिया समुदायाचे बहुतांश लोक या भागात राहतात.

तालिबानचे प्रवक्ते खालिद झदरन यांनी सांगितलं की, मृतांमध्ये विद्यार्थ्यांचा आकडा मोठा आहे. स्फोट झाला तेव्हा विद्यार्थी विद्यापीठात प्रवेश परीक्षा देत होते. ज्या शैक्षणिक केंद्रांना लक्ष्य केलं जात आहे त्यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याचा उद्धव ठाकरेंकडून एका शब्दात निकाल!
अफगाण पीस वॉच या स्वयंसेवी संस्थेने ट्वीटर पोस्टमध्ये म्हटलं आहे की, विद्यार्थ्यांमध्ये येत एका दहशतवाद्याने स्वत:ला स्फोटाने उडवून दिलं. काज शैक्षणिक केंद्राला लक्ष्य करण्यात आले. नुकताच काबूलमधील वजीर अकबर खान परिसरात बॉम्बस्फोट झाला होता. काबूलमधील रशियन दूतावासाबाहेर तुकत्याच झालेल्या स्फोटाचाही तीव्र निषेध करण्यात आला होता. गेल्या वर्षी अमेरिकेचे समर्थन असलेले सरकार पाडल्यानंतर तालिबानच्या राजवटीला एक वर्ष पूर्ण झालं आहे. असं असतानाही अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटांची मालिका सुरुच आहे.

मर्सिडिजच्या सीईओची कार पुण्याच्या ट्रॅफिक जाममध्ये अडकली, रिक्षावाला कसा ठरला देवदूत?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here