Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 30, 2022, 7:01 PM
Pune News : पुणे जिल्ह्यासह शहरात पावसाने चांगलाच हाहाकार उडवला आहे. अनेक ठिकाणी झाडे पडली तर रस्त्यावर पाण्याचे लोंढे वाहत आहेत. पावसाच्या पाण्याने पुणे तुंबल्याचे चित्र आहे. फक्त अर्ध्या तासात एवढा पाऊस झाला आहे.

हायलाइट्स:
- मुसळधार पावसामुळे झाड कोसळून रिक्षाचालकाचा मृत्यू
- पुण्यातील धक्कादायक घटना
- पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले
पुण्यात पावसाने अचानक जोर धरल्याने अनेक सखल भागात पाणी साचले. नाना पेठ, चमडी गल्ली येथे तर मुसळधार पावसाने गाड्या पडल्या असून पावसाचा जोर वाढला तर त्या वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसामध्ये नागरिकांनी एका ठिकाणी थांबावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रस्ता पेठ कल्याणी नगर, स्वारगेट, बालाजी नगर, धनकवडी, कात्रज, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने अवघ्या अर्ध्या तासात दाणादाण उडवली असल्याचं पाहायला मिळाले.
त्याचबरोबर या भागामध्ये प्रचंड असं पाणी साठल्यामुळे वाहतूक कोंडीला प्रचंड त्रास होत आहे. परंतु या पावसाचा फटका मात्र एका वयोवृद्ध ड्रायव्हरचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. चारच्या सुमारास पुण्यामध्ये जवळपास सर्वच भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली होती प्रचंड असा वारा असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी झाडे कोसळलेली आहेत. या ठिकाणी अग्नीशामक दलाचे जवान या ठिकाणी मदत कार्य करत आहेत.
ठाकरेंचा एक तीर आणि आढळराव पाटील, शिवतारे आणि सोनावणेंवर निशाणा
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.