हा ‘छोटे खान सर’ म्हणजे बॉबी राज. तो पाटणा जिल्ह्यातील मसौरी, चापोर गावात इयत्ता तिसरीचा विद्यार्थी. बॉबी राजला दहावीपर्यंतचा गणिताचा अभ्यासक्रम केवळ तोंडपाठच नाही,तर स्वतःहून मोठ्या मुलांनाही तो गणित शिकवतो. बॉबी राजने आपल्या वडिलांकडून शिकवण्याची कला शिकून घेतली. बॉबी राजला गणिताची सूत्रे सोप्या पद्धतीने मुलांना समजावून सांगताना जो कोणी पाहतो, त्याला आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहत नाही.
बॉबी राज घरातील शाळेतच मुलांना शिकवतो
बॉबीची आई चंद्रप्रभा यांनी सांगितले की, कोरोनामुळे त्याने गेल्या वर्षी घरीच शाळा उघडली. जवळची मुले त्यात शिकतात. येथे सुरुवातीपासून दहावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. शिकवण्यासाठी खूप कमी शिक्षक आहेत. वरिष्ठ वर्गातील मुले कनिष्ठ मुलांना शिकवतात. येथे शुल्क नगण्य ठेवण्यात आले आहे. यात बॉबी राजही शिकतो.
मला गणित खूप आवडते: ज्यूनियर खान सर बॉबी राज
चंद्रप्रभा यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाला गणिताचा संपूर्ण अभ्यासक्रम तोंडपाठ आहे. कोणत्याही प्रकरणातील प्रश्नाचे उत्तर तो अगदी सहज देतो. बॉबी राजने सांगितले की, त्याला गणिताचा अभ्यास करायला आवडते. त्याला त्याचे आई-वडील आणि बहिणी घरी शिकवतात. खान सर हे त्यांचे आदर्श आहेत. या छोट्या खान सराला गणितात नाव कमवायचे आहे.