परभणी : मुलांना खाण्यासाठी आणण्यासाठी पत्नीने पैसे मागितल्यानंतर पतीने माझी सकाळची झोप का मोडली, असं म्हणत गर्भवती पत्नीला शिवीगाळ करुन मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना परभणी शहरातील पारवा गेट भागात घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरफराज खान असं गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.

परभणी शहरातील पारवा गेट भागात राहणाऱ्या महेविश अंजूम यांनी मुलांना सकाळी खाण्याचे सामान आणण्यासाठी पैसे मागितले. मात्र, पत्नीने झोपेतून उठवून पैसे मागितल्याने संतापलेल्या सरफराज खान यांनी माझी झोप का मोडली म्हणून गर्भवती असलेल्या पत्नीला मारहाण केली. दोघांमध्ये कडाक्याचं भांडण सुरु असल्याने महेविश अंजूम यांच्या आई भांडण सोडवण्यासाठी आल्या असता सरफराज खान यांनी त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

नैसर्गिक वायूच्या दरात मोठी वाढ, मात्र गॅस सिलिंडरच्या दरात कपात; पाहा नवे दर
हा प्रकार घडल्यानंतर महेविश अंजूम यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पती सरफराज खान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत. दरम्यान, मागील काही दिवसापासून परभणीमध्ये महिलांना मारहाण करण्याच्या घटनेत वाढ झाली आहे.

Milind Narvekar : मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात जाणार?, CM शिंदेंच्या मंत्र्याने केला गौप्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here