नवी दिल्ली: अमेरिकेच्या फेड रिझर्व्हच्या पावलावर पाऊल ठेवून RBI ने देखील कर्जदारांची झोप उडवली आहे. ३० सप्टेंबर रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात अर्ध्या टक्क्याने वाढ जाहीर करत ऐनसणासुदीला सर्वसामान्यांच्या खिशाचा भार वाढवला आहे. यानंतर मध्यवर्ती बँकेच्या पावलावर पाऊल टाकत देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि HDFC बँकेने कर्जाच्या व्याजदरात वाढ जाहीर केली. आरबीआयने आपल्या चलनविषयक पतधोरण बैठकीत रेपो दरात ०.५० टक्क्यांनी वाढ केल्यानंतर बँकांनीही व्याजदर वाढवले आहेत. चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने द्विमासिक पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेट रेपो ०.५ टक्क्यांनी वाढवून ५.९ टक्के केला आहे.

RBI ने पुन्हा वाढवला व्याजदर, जाणून घ्या किती वाढणार तुमचा EMI
गृहनिर्माण कर्ज कंपनी HDFC लिमिटेडने शुक्रवारी कर्जावरील व्याजदरात ०.५० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. व्याजदर वाढल्याने एचडीएफसीकडून आता गृहकर्ज घेणाऱ्यांच्या मासिक हप्त्यात वाढ होईल. “HDFC ने १ ऑक्टोबर २०२२ पासून गृह कर्जावरील व्याजदरात ०.५० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे,” एचडीएफसीने एका निवेदनात म्हटले आहे. त्याचवेळी, एसबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बँकेने बाह्य बेंचमार्क आधारित कर्ज दर (EBLR) आणि रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) मध्ये अनुक्रमे ०.५० टक्क्यांनी वाढ केली आहे, जे आता अनुक्रमे ८.५५ टक्के आणि ८.१५ टक्के झाले आहे. ही वाढ शनिवारपासून लागू होणार आहे. बँक ऑफ इंडियानेही RBLR ८.७५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. याशिवाय ICICI बँकेचा EBLR ९.६० टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

RBI Repo Rate: ऐन सणासुदीच्या काळात कर्ज आणखी महाग होणार; RBIकडून रेपो रेटमध्ये वाढ
RBI मधील तीन सदस्य आणि तीन बाह्य तज्ञांचा समावेश असलेल्या चलनविषयक धोरण समितीने (MPC) शुक्रवारी मुख्य कर्ज दर किंवा रेपो दर ५.९० टक्के वाढवला, जो एप्रिल २०१९ नंतरचा उच्चांक आहे. मे महिन्यात पहिल्या अनियोजित मध्य-बैठकीत वाढ झाल्यापासून व्याजदरातील एकत्रित वाढ आता १९० बेसिस पॉईंट्सवर आहे आणि मागणी कमी करून चलनवाढ रोखण्यासाठी जगभरातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये समान आक्रमक भूमिका घेतली जात आहे.

कही खुशी, कही गम! रेपो दरात आणखी अर्ध्या टक्क्याने वाढ, बँक ग्राहकांना कसा होणार फायदा
आरबीआयची दरवाढ
तीन दिवस (२८ ते ३० सप्टेंबर) चाललेल्या MPC बैठकीनंतर RBI गव्हर्नरने रेपो दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. मध्यावरती बँकेने रेपो दरात ०.५०% वाढ करण्याची घोषणा केली आहे. आता बँकेचा रेपो दर ५.४% वरून ५.९% पर्यंत वाढला आहे. याआधी ऑगस्टमध्ये आरबीआयने रेपो दरात ६० बेसिस पॉईंटची वाढ केली होती. मे महिन्यात झालेल्या एमपीसीच्या बैठकीतही रेपो दर ५० बेसिस पॉइंट्सने वाढवून ४.९०% करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here