सानेवाडी येथे राहणारा ३५ वर्षीय प्रशांत हा गेल्या १५ वर्षांपासून साप पकडतो, नेहमीप्रमाणे विक्रमशिला नगर येथे निघालेल्या सापाला त्याने पकडलं. रेस्क्यू केल्यावर त्याला सोडण्यासाठी जात असताना तो साप बॉटलमधून बाहेर पडला. त्यामुळे पुन्हा पकडण्याचा प्रयत्न केला आणि पकडल्यावर त्याच्याशी खेळ केला.
त्याला खिशात टाकून फिरण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. सापाशी खेळत असताना डाव्या हाताच्या बोटाला दंश झाला. पण या दंशाविषयी सर्पमित्राला कळलं देखील नाही. अचानक रात्री तब्येत बिघडली आणि रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली. शेजाऱ्यांनी त्याला रुग्णालयात नेल्यावर मात्र, लगेच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या तरुणाला सापासोबत खेळणे चांगलचं जीवावर बेतलं आहे.