जयपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचा दौरा करून राजस्थानच्या अबू रोडला पोहोचले. तिथे ते एका कार्यक्रमाला संबोधित करणार होते. मात्र त्यांना तिथे पोहोचायला उशीर झाला. मोदी रात्री १० नंतर कार्यक्रमस्थळी पोहोचले. रात्री १० नंतर लाऊडस्पीकरचा वापर करता येत नाही. या नियमाचं पालन मोदींनी केलं. त्यांनी लोकांचं अभिवादन स्वीकारलं आणि माईकशिवाय संवाद साधला. अवघ्या मिनिटभराचं भाषण करून मोदी निघाले.

रात्री १० नंतर लाऊडस्पीकरचा वापर करता येत नाही. मोदी कार्यक्रमस्थळी १० नंतर पोहोचले. त्यामुळे त्यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या लोकांशी व्यासपीठावरून मिनिटभर संवाद साधला. राजस्थानचा दौरा आधीच निश्चित झाला होता. मात्र दौरा पूर्वनियोजित असूनही मोदींना पोहोचण्यास उशीर झाला. गुजरातच्या सीमेपासून जवळ असलेल्या अबू रोड येथील कार्यक्रमात मोदी रात्री ८ पर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना पोहोचण्यास विलंब झाला.
काँग्रेस अध्यक्षपदाचा फॉर्म भरताच विजयाची खात्री,शशी थरुर यांच्याकडून त्या ३ निवडणुकांचा दाखला
रात्रीचे १० वाजून गेल्यानं मोदींनी माईकचा वापर टाळला. त्यांनी माईकशिवाय उपस्थितांशी संवाद साधला. मला पोहोचायला उशीर झाला. रात्रीचे १० वाजलेत. नियमांचं पालन करायला असं मला माझा आत्मा सांगतो. त्यामुळे मी आपली क्षमा मागतो. मात्र मी इथे पुन्हा येईन, असा विश्वास तुम्हा सगळ्यांना देतो. मी पुन्हा येईन आणि तुम्ही मला जे प्रेम दिलंय त्याची व्याजासह परतफेड करेन, असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींचं भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक जमले होते. त्यांनी मोबाईलमधील फ्लॅश लाईट सुरू करून मोदींचं स्वागत केलं. मोदी मंचावरून पुढे गेले. ते उपस्थितांच्या शक्य तितक्या जवळ गेले. त्यांनी उपस्थितांची माफी मागितली. मला येण्यास उशीर झाला. पुढल्या वेळी इथे नक्की येईन, असा शब्द त्यांनी उपस्थितांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here