Thane News : पहाटे साखर झोपेत असताना अचानक लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघेजण गंभीररित्या भाजल्याची घटना डोंबिवलीतील भोपर परिसरात घडली आहे. यात आई आणि दोन मुली ९० टक्के भाजल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

Fire News
पहाटे झोपेत असताना घरात अचानक आग; आईसह दोन लेकी गंभीर जखमी

हायलाइट्स:

  • पहाटे साखर झोपेत असताना अचानक लागली आग
  • एकाच कुटुंबातील चौघेजण आगीत भाजले
  • डोंबिवलीतील भोपर परिसरातील घटना
ठाणे : पहाटे साखर झोपेत असताना अचानक लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघेजण गंभीररित्या भाजल्याची घटना डोंबिवलीतील भोपर परिसरात घडली आहे. यात आई आणि दोन मुली ९० टक्के भाजल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

डोंबिवली नजिक असलेल्या भोपर परिसरातील बस स्टॉपजवळ प्रसाद पाटील आपल्या कुटुंबासह राहतात. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अचानक घरात आग लागली आणि काही कळायच्या आत झोपेत असलेले प्रसाद यांच्यासह पत्नी प्रिती, १४ वर्षाची मुलगी समीरा आणि ११ वर्षाची मुलगी समीक्षा या आगीत जवळपास ९० टक्के होरपळले असून शेजाऱ्यांनी त्यांना तातडीने जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केले.

दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे ‘टायमिंग’ साधणार; ठाकरेंना कसा शह देणार? प्लानिंग ठरलं
मात्र, कोणताही स्फोट झाल्याचा आवाज आला नसल्याने घरात नेमकी आग कशामुळे लागली याचा शोध पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून सुरु आहे. जखमींवर एम्स रुग्णालयात उपाचार सुरु आहेत. तर आईसह दोघं मुलींची प्रकुती चिंताजनक आहे.

नामिबियातून आलेल्या ‘आशा’ने दिली गुडन्यूज; देशातील चित्त्यांची संख्या वाढणार

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here