विमानतळावरील सुरक्षारक्षकानं सोन्याची पेस्ट पकडली आहे. या सोन्याचं एकूण मूल्य ७० लाख रुपयांच्या घरात आहे. फरशी पुसण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मॉपमध्ये सोन्याची पेस्ट आढळून आली. या प्रकरणी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सफाई कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

 

chennai airport
चेन्नई: विमानतळावरील सुरक्षारक्षकानं सोन्याची पेस्ट पकडली आहे. या सोन्याचं एकूण मूल्य ७० लाख रुपयांच्या घरात आहे. फरशी पुसण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मॉपमध्ये सोन्याची पेस्ट आढळून आली. या प्रकरणी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सफाई कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

२९ सप्टेंबरला रात्री पावणे बाराच्या सुमारास एल. रामकुमार विमानतळाच्या ट्रान्सिट एरियामध्ये पोहोचला. रामकुमार विमानतळावर सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे त्याच्याकडे फरशी पुसण्यासाठी असलेला मॉप होता. हा मॉप त्यानं डोअर फ्रेम मेटल डिटेक्टरच्या बाहेर ठेवला. त्यामुळे तिथे असलेल्या सीआयएसएफच्या कर्मचाऱ्याला संशय आला.
नळातून पाण्याऐवजी येते दारू! खबरीकडून टिप, पण पोलिसांचा विश्वास बसेना; सेटिंग पाहून चक्रावले
रामकुमारच्या हालचालींबद्दल संशय वाटल्यानं सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यानं त्याची अधिक चौकशी केली. आपण ट्रान्सिट एरियामध्ये सफाईसाठी जात असल्याचं रामकुमारनं सांगितलं. त्यामुळे संशय अधिकच बळावला. सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यानं मॉप स्कॅनरखाली धरला. मॉपच्या पोकळ दांड्यामध्ये काहीतरी घन वस्तू असल्याचं दिसून आलं.
दोघांशी अफेअर; एकटी असताना एकाला बोलावलं, दुसऱ्याला समजलं, त्यानं घर गाठलं अन् मग…
संशय अधिक वाढल्यानं सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यानं मॉप उघडला. त्या पोकळ दांड्यामध्ये सोन्याच्या १० काड्या आढळून आल्या. त्या काळ्या रंगाच्या टेपमध्ये गुंडाळण्यात आल्या होत्या. त्यांचं वजन १.८११ किलो होतं. त्यांचं मूल्य जवळपास ७० रुपये इतकं आहे. याची माहिती एअर इंटेलिजन्स युनिटला देण्यात आली. सफाई कर्मचाऱ्याला त्यांच्या ताब्यात देण्यात आलं. या प्रकरणाचा अधिक तपास एअर इंटेलिजन्स युनिट करत आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here