Authored by रहीम शेख | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Oct 1, 2022, 2:28 PM
Osmanabad News : शारदीय नवरात्र महोत्सवात शनिवारी सहाव्या दिवशी श्री. तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री. तुळजा भवानीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली.

हायलाइट्स:
- तुळजा भवानीची शेषशाही अलंकार महापूजा संपन्न
- उद्या भवानी तलवार अलंकार महापूजा
- नवरात्र विशेष बातम्या
ते उत्पन्न होताच शेष शैयावरील विष्णूवरती आक्रमण करण्यास जाऊ लागले. त्यावेळी नाभी कमलात विराजमान असलेल्या ब्रम्हदेव यांनी विष्णूच्या नेत्र कमलात विश्राम घेणाऱ्या देवीची स्तूती करुन श्रीस जागविले व विष्णूवरती आक्रमण करणाऱ्या दैत्यांचा वध श्री तुळजाभवानी मातेने केला म्हणून विष्णूने आपले शेष शैया श्रीस विश्राम करण्यासाठी दिले. त्यामुळे ही शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येते. अशी आख्यायिका सांगितली जाते.
शारदीय नवरात्र महोत्सवात दररोज नियमित श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. यात, उद्या २ ऑक्टोबरला भवानी तलवार अलंकार महापूजा आणि ३ ऑक्टोबरला महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत. दरम्यान, काल रात्री श्री देवीजींची सिंह वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.