नवी दिल्ली: स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), बँकिंग सुविधांसाठी सर्वसामान्य लोकांचा सर्वात विश्वासू आणि देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, आपल्या भागधारकांसाठी देखील फायदेशीर ठरली आहे. एसबीआयने ३० वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या भागधारकांना २९ वेळा परतावा दिला आहे. त्याचवेळी, जर आपण एसबीआयच्या मार्केट कॅपबद्दल बोलायचे तर त्याने ५ लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेनंतर हा आकडा पार करणारी एसबीआय देशातील तिसरी सर्वात मोठी बँक आहे.

गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी! सेबी कडून IPO नियमांत बदल, तुमच्यावर काय परिणाम होईल
यंदा शेअर्स १२ टक्के तेजीत
एसबीआयच्या शेअर्समध्ये यंदा १२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून त्यात अजूनही एक तेजी दिसत आहे. मार्केट तज्ज्ञांनी यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी ६८० रुपयांची टार्गेट किंमत निश्चित केली आहे, जे एसबीआय शेअर्सच्या सध्याच्या किमतीपेक्षा २८ टक्के जास्त आहे. शुक्रवारी त्याचे शेअर्स बीएसईवर ५३१.०५ रुपयांवर बंद झाले.

टाटा ग्रुपचा ‘हा’ शेअर देईल ३५ टक्के रिटर्न, खरेदी करण्याची उत्तम संधी
भागधारकांना २९ पट परतावा

एसबीआयचे शेअर्स देखील त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी खूप फायदेशीर ठरले आहेत. १४ जुलै १९९५ रोजी त्याचे शेअर्स १८.५९ रुपयांच्या भावात होते, जे आज ५३१.०५ रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत. अशाप्रकारे ३० वर्षांपेक्षा कमी कालावधीत SBI ने आपल्या भागधारकांच्या पैशात सुमारे २९ पट वाढ केली आहे. काही दिवसांपूर्वी १५ सप्टेंबर रोजी शेअर्सने सुमारे ५७८.६५ रुपयांची विक्रमी किंमत गाठली होती. मात्र, त्यानंतर प्रॉफिट बुकींगमुळे त्याची किंमत ५३१.०५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

मार्केटमधून दमदार कमाईची ऑफर! एका शेअरवर मिळवा ६ मोफत शेअर्स
भाविषयात स्थिती काय?
एसबीआयच्या बाजारातील भविष्यातील स्थितीबद्दल बोलायचे तर एसबीआयची बँकिंग प्रणाली भारतातील सर्वात शक्तिशाली स्थितीत आहे. त्यामुळे, इतर PSU बँकांच्या तुलनेत कोणत्याही अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी एसबीआय चांगल्या स्थितीत आहे. एसबीआयचा नफा २९ टक्क्यांच्या CAGR (कम्पाउंड अॅन्युअल ग्रोथ रेट) आणि आर्थिक वर्ष २०२२-२४ मध्ये १३ टक्क्यांच्या CAGRने वाढू शकतो.

दुसरीकडे, त्याचा ROA आर्थिक वर्ष २०१४ पर्यंत ०.९ टक्के आणि ROE १५.१ टक्के होईल असा विश्लेषकांचा अंदाज आहे. या सर्व कारणांमुळे केआर चोक्सीने याला बाय रेटिंग दिले आहे आणि लक्ष्य किंमत ६१७ रुपयांवरून ६८० रुपये केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here