नाशिक : शहरात गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीचे सत्र सुरू असून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत लाखो रुपये किंमतीच्या मोटारसायकली चोरणाऱ्या तीन संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. शहर पोलिसांच्या परिमंडळ २ आणि नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. संशयतांनी आजपर्यंत चोरलेल्या तब्बल २९ मोटारसायकल पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

नाशिकरोड गुन्हे शोध पथक आणि मोटार सायकल चोरी प्रतिबंध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी अतुल पाटील ( वय २६) यास सिडको भागातून ताब्यात घेतले. त्यांतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. संशयित पाटीलला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने त्याचे २ साथीदार पवन रमेश पाटील (रा. सिडको) आणि हृतिक उत्तम अडसुळे (रा. दत्त मंदिर चौक, नाशिकरोड) यांनी नाशिक आणि इतरही जिल्ह्यांमधून मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. संशयिताने नमूद केल्याप्रमाणे पोलिसांनी ७ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या २९ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.

उद्धव भावोजींचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर, शर्मिला वहिनींची चार शब्दात प्रतिक्रिया

पोलिसांनी १५ आरोपींना अटक करून त्यावर २२ लाख २० हजार रुपये किंमतीच्या एकूण ६६ मोटार सायकल जप्त केलेल्या आहेत. त्यामध्ये नाशिकरोड पोलीस ठाणे आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या प्रत्येकी १ गुन्हासह नाशिक जिल्ह्यातील आणि बाहेरील एकूण १५ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मुंबईकरांसाठी पोलिसांचा महत्त्वाचा मेसेज; ५ ऑक्टोबर रोजी २४ तासासाठी होणार आहेत हे बदल

दरम्यान, पोलिसांनी तीन मोटरसायकल चोरट्यांना ताब्यात घेऊन ही कारवाई केल्यानंतर संशयितांकडून हस्तगत केलेल्या मोटरसायकली या एखादं वाहन बाजार भरवता येईल एवढ्या आहेत. नाशिक पोलिसांच्या कारवाईने मोटारसायकल चोरणाऱ्या ‘मोस्ट वॉन्टेड’ टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मोटरसायकली पोलीस ठाण्यात आणून ठेवल्यानंतर पोलीस ठाण्याला जणू वाहन बाजाराचे स्वरूपच प्राप्त झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here