पुणे : रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफार्म क्रमांक एकवर उभ्या असलेल्या गोरखपूर एक्सप्रेसवर चढून चालत निघालेल्या तरुणाने रेल्वेची ओव्हरहेड वायर पकडल्यामुळे स्फोट होऊन तो गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडली. वीजेचा जोरात धक्का लागल्यानंतर तरुण उडून प्लॅटफार्मवर पडल्यानंतर त्याला पोलिसांनी तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला की दुसरं काही कारण हे स्पष्ट झालेलं नाही.

गोवर्धन मल्ला (वय ३३, रा. कटक, ओरिसा) असं या तरुणाचं नाव आहे मल्ला हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. तो कामासाठी निमित्ताने पुण्यात आला होता. तो खेड परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्याच्याकडे विशाखापट्टणम गाडीचे तिकीट सापडले आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.

विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्री शिंदेही झाले विद्यार्थी, खुर्चीवर न बसता बसले बेंचवर, म्हणाले…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडिया कॉलेजजवळील सिग्नल येथे गोरखपूर एक्सप्रेस थांबली असताना मल्ल हा रेल्वे गाडीवर चढला. तो रेल्वे गाडीवरून चालत आला. गोरखपूर एक्सप्रेस ही पुणे स्टेशन प्लॅटफार्म क्रमांक एक येथे आल्यानंतर तो रेल्वेवरून चालत होता. त्यावेळी पोलिसांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याने तारेला हात लावताच मोठा स्फोट झाला. तो उडून प्लॅटफार्म क्रमांक एकवर पडला.

त्याला लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गोवर्धन हा पूर्णपणे भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांना त्याच्या खिशात विशाखापट्टणम गाडीचे तिकीट सापडले आहे. या घटनेची माहिती त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला किंवा दुसरे काही कारण आहे हे समजू शकलेले नाही. त्याचे नातेवाईक आल्यानंतर या घटनेचा उलगडा होऊ शकतो, असं लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.

VIDEO : बापरे! सोनं तस्करांची अनोखी शक्कल, कस्टम अधिकारीही चक्रावले; लाखोंचं सोनं जप्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here