काय म्हणाले भुजबळ ?
माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे याची मला कल्पना देखील नाहीये. मला सुद्धा याबाबत बातम्यांमधूनच समजलं आहे. माझ्यासोबत गेल्या दहा वर्षांपासून शत्रुत्व पत्करलेल्या ललित टेकचंद यांनी हा गुन्हा दाखल केलाय. मात्र मी गेले अनेक वर्षंपासून त्यांच्याशी बोललो सुद्धा नाही. मला त्यांनी सरस्वती पूजनावरून मेसेज टाकत त्रास दिला होता, म्हणून माझ्या काही कार्यकर्त्यांनी फक्त याबाबत त्यांना जाब विचारला होता. मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची धमकी देण्यात आलेली नाही. गेल्या दहा वर्षांपासून मी त्यांच्यासोबत बोलत नाही. मला माझ्या नंबरवर अतिशय घाणेरडे मेसेज टाकून त्रास देण्यात आले होते. यात राजकीय हस्तक्षेप मला वाटत नाही. हा बालिशपणा आहे. असे स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिले आहे.
एका व्यापाऱ्याला धमकावल्याप्रकरणी माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांच्याविरोधात चेंबूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूरचे व्यापारी ललित टेकचंदानी यांनी छगन भुजबळ यांच्यासह अन्य दोघांविरोधात धमकी दिल्याची तक्रार चेंबूर पोलिसांकडे दिली आहे. टेकचंदानी यांनी छगन भुजबळ यांना त्यांच्या मोबाईलवर दोन व्हिडीओ पाठवले होते. भुजबळांनी हिंदू धर्माचा अपमान करणारे भाषण केल्याचे हे दोन व्हिडीओ होते. त्यानंतर लगेचच टेकचंद यांना धमकीचे फोन आणि मेसेज आले असा आरोप आहे.
ललित चंदानीचे आरोप
फोन करणाऱ्याने शिवीगाळ करत ‘तू भुजबळ साहेबांना मेसेज पाठवतो ? मी घरी येऊन तुला गोळ्या झाडेन’, असे ललितने चंदानीने सांगितले आहे. ही धमकी ऐकून ललितने फोन कट केल्यानंतर लगेचच दुपारी ४.२० वाजता त्याच नंबरवरून पुन्हा कॉल आला आणि कॉलर शिवीगाळ करत मी तुझ्यामागे दुबईचा माणूस लावेल, ही अखेरची चेतावनी, अशी धमकी दिल्याचं सांगितलं आहे.