Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Oct 1, 2022, 8:56 PM

Lady Reporter Viral Video : वादळाचे रिपोर्टींग करताना एका महिला रिपोर्टरला पावसाचा बराच सामना करावा लागत होता. त्यामुळे रिपोर्टरने आपला माइक पाण्यात भिजण्यापासून वाचण्यासाठी एक अजब पद्धत वापरली आहे. याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

 

World News
VIDEO : महिला रिपोर्टरचे माइकवर कंडोम लावून रिपोर्टिंग; कारण वाचून तुम्हीही डोक्याला हात माराल

हायलाइट्स:

  • रिपोर्टर करत होती वादळाचे रिपोर्टींग
  • पाण्यापासून माइकचा बचाव करण्यासाठी वापरलं विचित्र पद्धत
  • महिला रिपोर्टरने माइकवर चक्क कंडोम लावला
फ्लोरिडा : सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक महिला रिपोर्टर चक्क तिच्या माइकवर कंडोम लावून रिपोर्टिंग करत असल्याचे पाहायला मिळालं आहे. ज्याचा व्हिडिओ आता समोरा आला आहे. त्यानंतर संबंधित महिला रिपोर्टरनेही तिने असं का केलं यामागचं खरं कारण सांगितलं आहे. यावेळी महिला रिपोर्टरने दिलेले कारण हैराण करणारे आहे. हा व्हिडिओ अमेरिकेतील फ्लोरिडा येथील असल्याचं समोर आलं आहे. जिथे सध्या भयानक वादळ आहे.

‘डेली स्टार’च्या वृत्तानुसार, NBC चॅनलसाठी काम करणारी महिला रिपोर्टरचं नाव कायला गेलर आहे. गेलर या वादळाचे रिपोर्टिंग करत होती. फ्लोरिडाला आलेल्या भीषण वादळाची माहिती देत असताना तिला सातत्याने पावसाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे रिपोर्टरने आपला माइक पाण्यात भिजणार नाही यासाठी एक विचित्र पद्धत वापररली आहे. त्यासाठी तिने आपल्या माइकवर कंडोम लावला. जेव्हा लोकांनी माइकवर कंडोम लावलेला पाहिला तेव्हा त्यांना देखील काहीसा धक्का बसला.

IND vs SA: टीम इंडियातील या खेळाडूचे वाईट दिवस सुरू, आता Playing xi मधूनही बाहेर
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी विचारणा केली की, रिपोर्टरच्या हातात असलेल्या माइकवर खरोखरच कंडोम आहे का? यानंतर महिला रिपोर्टरने तिच्या इंन्स्टाग्रामवर याबाबत खुलासा केला. माइक ओला होणार नाही यासाठी आपण असं केल्याचे महिला रिपोर्टरने यावेळी सांगितलं. जर तिने तसं केलं नसतं तर तिचा माइक ओला झाला असता आणि ती रिपोर्टिंग करु शकली नसती, असं तिने सांगितलं.

उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांना ओळखायला कमी पडले? या तीन हालचालींनंतर वारं फिरलंय!

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here