दरम्यान, तत्पूर्वी जिल्हा परिषदेने सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेऊन विश्वस्ताच्या भूमिकेतून विकासाभिमुख कामे करावीत, अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी आज झालेल्या बैठकीत दिल्या. केंद्राच्या योजनांचा मोठ्या प्रमाणात निधी येत असतो. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव गतीने तयार करणे, मंजुरीसाठी पाठवणे तसxच त्यांचा केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करावी. केंद्र तसंच राज्याच्या अधिकाधिक योजना राबवण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न करावेत, अशाही सूचना चंद्रकांत पाटील यांनी केल्या.
दरम्यान, यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेतील विविध विभागांद्वारे राबवण्यात येत असलेल्या योजना व कामांची सविस्तर माहिती घेतली. अंगणवाडी बांधकाम, रस्ते, शाळा सुधार योजना, प्राथमिक आरोग्य केंद्रे आदींसाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल असे सांगतानाच जनतेच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी प्राधान्याने निधीची तरतूद ठेवावी, असे निर्देशही त्यांनी दिले.