ajit pawar criticizes ranajagjitsinha patil : विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान अजित पवार हे पाटील कुटुंबावर काय बोलणार, याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. अखेर संयम सोडत अजित पवार यांनी उमरगा शहरातील भाऊसाहेब बिराजदार बँकेच्या कार्यक्रमादरम्यान राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी आपल्या मनातील शल्य बोलून दाखवले.

हायलाइट्स:
- अजित पवार यानी बोलून दाखवले मनातील शल्य.
- राणा जगजितसिंह यांच्यावर केली टीका.
- अजित पवारांनी उस्मानाबाद दौऱ्यादरम्यान केली टीका.
‘राणा पाटलाला कुठली अवदसा सुचली अन राष्ट्रवादी काँग्रेस सोडली. त्याला काय कमी केलं होतं’, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यावर टीका केली आहे .
क्लिक करा आणि वाचा- भरसभेत चिठ्ठी आली, अजितदादांची मंचावरच गाणं गुणगुणायला सुरुवात, कार्यकर्ते लोटपोट
विरोधी पक्षनेते अजित पवार उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान अजित पवार हे पाटील कुटुंबावर काय बोलणार, याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. अखेर संयम सोडत अजित पवार यांनी उमरगा शहरातील भाऊसाहेब बिराजदार बँकेच्या कार्यक्रमादरम्यान पाटील कुटुंबावर टीका केली. राणा पाटलाच्या डोक्यात कुठली अवदासा शिरली अन राष्ट्रवादी काँग्रेस सोडली त्याला काय कमी केलं होतं अशा शब्दात अजित पवार यांनी पाटील कुटुंबावर टीका केली
क्लिक करा आणि वाचा- मी कात टाकली! सासरेबुवा सुनेच्या पाठिशी खंबीर उभे राहिले, विधवा सुनेने सुप्रिया सुळेंना थरथरत्या हाताने लावलं कुंकू
क्लिक करा आणि वाचा- Tanaji Sawant: राज्यात सत्तांतर होताच लगेच तुम्हाला मराठा आरक्षणाची खाज सुटली: तानाजी सावंत
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.