दुर्ग: छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. पतीच्या सततच्या टोमण्यांना कंटाळून पत्नीनं टोकाचं पाऊल उचललं. तू सावळी दिसतेस, मुलांसारखी वागतेस, असे टोमणे पती सतत मारायचा. सततच्या टोमण्यांमुळे संतापलेल्या पत्नीनं पतीची निर्घृणपणे हत्या केली. आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

लग्नानंतर पती दररोज मला कुरुप म्हणायचा. तू मुलासारखी दिसतेस. तू किती काळी आहेस. कधी स्वत:चा चेहरा आरशात बघ, असं पती आपल्याला दररोज ऐकवायचा, अशी माहिती पत्नीनं पोलिसांना चौकशीत दिली. पतीच्या टोमण्यांना कंटाळून महिलेनं कुऱ्हाडीनं वार करून पतीला संपवलं. अमलेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापसी गावात ही घटना घडली. पोलिसांनी महिलेला अटक करून कोर्टात हजर केलं. कोर्टानं तिला चार महिन्यांचा तुरुंगवास ठोठावला.
कुटुंबाचा विरोध पत्करून विवाह; ज्याच्यावर विश्वास ठेवला, त्यानंच घात केला; तरुणीचा करुण अंत
अनंत सोनवानी असं हत्या झालेल्या पतीचं नाव आहे. हत्या प्रकरणात त्याची पत्नी संगीताला अटक करण्यात आली आहे. घटना उघडकीस आल्यानंतर संगीतानं सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच तिनं गुन्ह्याची कबुली दिली. दीड वर्षांपूर्वी दोघांचा विवाह झाल्याचं महिलेनं सांगितलं. लग्नानंतर पती दररोज आपल्याला मारहाण करायचा. तू काळी आहेस. तू मुलांसारखी दिसतेस, अशा शब्दांत टोमणे मारायचा, असं संगीतानं पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितलं.
कामगार साफसफाईला निघाला; विमानतळावर शंका आली; मॉपच्या दांड्यानं ‘सफाई’ उघडी पडली
अनंत आणि संगीता यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला. अनंत यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर त्यानं दुसरं लग्न केलं. संगीता विवाहित होती. लग्नानंतर दोघांना मुलगी झाली. ती आता ४ महिन्यांची आहे. आपण रात्री जेवून झोपलो. सकाळी उठलो त्यावेळी पती मृतावस्थेत आढळून आल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं. मात्र पोलिसांना संशय आला. त्यांनी कसून चौकशी केली. तेव्हा तिनं गुन्ह्याची कबुली दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here