पाटणा : जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये महिला आणि बालविकास विभागाच्या व्यवस्थापकीय संचालिका हरजोत कौर यांनी २० वर्षीय शाळकरी रिया कुमारीने विचारलेल्या प्रश्नावर अजब उत्र दिले होते. या विद्यार्थ्याने झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब मुली आणि महिलांसाठी मासिक पाळी दरम्यान सरकारकडून मोफत सॅनिटरी पॅड मिळू शकतील का असा प्रश्न उपस्थित केला होता. या विद्यार्थिनीला हरजोत कौर यांनी दिलेल्या उत्तरानंतर त्याची दखल देशभरातील संपूर्ण मीडियाने घेतली होती. त्यामुळे सॅनिटरी पॅड बनवणाऱ्या एका कंपनीने रियाला वर्षभर पॅड मोफत पुरवण्याचे आणि तिचा शिक्षणाचा खर्च उचलण्याचे जाहीर केलं आहे.

“वेट अँड ड्राय पर्सनल हेल्थ केअर” या कंपनीच्या एव्हरटीन सॅनिटरी पॅड्स युनीटने रिया कुमारीला तिने केलेल्या धाडसाचे कौतुक म्हणून त्यांनी वर्षभर सॅनिटरी पॅड पुरवण्याचे आणि तिच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा कंपनी करेन असं सांगितलं. या कंपनीचे सीईओ हरिओम त्यागी म्हणाले की, “२०२२ मध्ये एव्हरटीनने केलेल्या मासिक पाळीच्या स्वच्छता सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की २३.५ टक्के स्त्रिया अजूनही अनियमित मासिक पाळी आणि त्याच्या संबंधीत समस्यांविषयी डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत. त्यामुळे मासिक पाळी हा पिढ्यानपिढ्या चर्चेचा विषय राहिला आहे. ते आता बदलावे लागेल. हे चित्र बदलवायचे असेल तर मुलींना पुढे येण्याची गरज आहे. ते पुढे म्हणाले की, मासिक पाळीविषयी खुली चर्चा करण्याची मागणी मुलींकडून होणे आवश्यक आहे. सार्वजनिक मंचावर या विषयावर धाडसाने बोलल्याबद्दल आम्ही रियाला सलाम करतो.

भारताच्या विजयाच्या अपेक्षांवर पाणी? दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यावर पावसाचे सावट
नंतर, राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) या घटनेची दखल घेतली आणि स्पष्टीकरण मागितले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर (NCW) प्रमुख म्हणाले, सात दिवसांत याचे उत्तर द्यावे. (NCW) प्रमुख रेखा शर्मा म्हणाल्या की, जबाबदार पदावरील व्यक्तीची अशी असंवेदनशील वृत्ती निंदनीय आणि अत्यंत लज्जास्पद आहे. आयोगाच्या अधिकृत निवेदनानुसार, अध्यक्ष रेखा शर्मा यांनी IAS हरजोत कौर भामरा यांना पत्र लिहून अयोग्य आणि आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल लेखी स्पष्टीकरण मागितले आहे. या घटनेबद्दल महिला अधिकाऱ्याने माफी मागितली आहे.

आता Bigg Boss Marathi 4 च्या गॅलरीत बसून स्पर्धक करणार ‘चाय पे चर्चा’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here