उस्मानाबाद : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. एखादी गोष्ट आवडली नाही तर ती सर्वांसमोर बोलून दाखवताना ते कोणताही मुलाहिजा ठेवत नाहीत. अजित पवार यांच्या याच स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील एका पदाधिकाऱ्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी कमकुवत होत असल्याचं सांगत पार्थ पवार यांच्याकडे उस्मानाबादचं नेतृत्व देण्याची मागणी केली. त्यानंतर अजित पवार यांनी सदर पदाधिकाऱ्याला चांगलंच झापलं.

‘उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी कमकुवत झाली आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्याकडे उस्मानाबाद जिल्ह्याचे नेतृत्व द्यावं,’ अशी मागणी शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांनी केली. त्यानंतर अजित पवार यांनी ‘जोपर्यंत पक्षाचा एक कार्यकर्ता आहे, तोपर्यंत पक्ष संपत नसतो,’ असे म्हणत पाटील यांची कानउघडणी केली आहे.

दरम्यान, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्याकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर पार्थ पवार हे राजकारणात फारसे सक्रीय नसल्याचं चित्र आहे. पिंपरी चिंचवडमधील एखादा दुसरा कार्यक्रम वगळता राष्ट्रवादीच्या मंचावरही ते दिसत नाहीत. त्यामुळे आगामी काळात पार्थ पवार यांच्या राजकारणाची दिशा काय असणार, याबाबत राजकीय वर्तुळात कायमच तर्क-वितर्क लढवले जातात.

काँग्रेसच्या साथीने आनंद दिघेंनी ठाण्यात भाजपला कसं दूर ठेवलं? ‘सामना’तून शिंदेंच्या दाव्याचं पोस्टमार्टेम

अजित पवारांनी घेतला राणा पाटलांचा समाचार

अजित पवार हे शनिवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान अजित पवार हे पाटील कुटुंबावर काय बोलणार, याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. अखेर संयम सोडत अजित पवार यांनी उमरगा शहरातील भाऊसाहेब बिराजदार बँकेच्या कार्यक्रमादरम्यान पाटील कुटुंबावर टीका केली. राणा पाटलाच्या डोक्यात कुठली अवदासा शिरली अन् राष्ट्रवादी काँग्रेस सोडली त्याला काय कमी केलं होतं अशा शब्दात अजित पवार यांनी पाटील कुटुंबावर टीका केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here