कोटक सिक्युरिटीजचे इक्विटी रिसर्च (रिटेल) प्रमुख श्रीकांत चौहान म्हणाले, “सध्याच्या जागतिक चलनवाढीच्या काळात ब्रिटीश सरकारच्या वित्तीय धोरणांचा जागतिक मुद्रा बाजारावर खोलवर परिणाम झाला आहे आणि इक्विटी मार्केट देखील जोखीमविरोधी बनले आहेत.” देशांतर्गत आघाडीवर, सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) अंदाजात अंशत: घट होण्याव्यतिरिक्त, इंधनाशी संबंधित चिंता देखील आहेत, असे ते म्हणाले.
ऑगस्टमध्येही काढले पैसे
डिपॉझिटरी डेटानुसार, FPIs ने सप्टेंबरमध्ये ७,६२४ कोटी रुपयांच्या समभागांची निव्वळ विक्री केली आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये त्यांनी भारतीय बाजारपेठेत ५१,००० कोटी रुपयांची आणि जुलैमध्ये सुमारे ५,००० कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली होती.
तथापि, त्यापूर्वी सलग नऊ महिने, FPIs भारतीय बाजारपेठेत निव्वळ विक्रेते म्हणूनच वावरले. ऑक्टोबर २०२१ ते जून २०२२ या कालावधीत, FPIs ने फक्त भारतीय बाजारातून पैसे काढले.
परकीय गुंतवणूकदारांमध्ये निराशा
FPIs ने सप्टेंबर २०२२ या महिन्यात सकारात्मक सुरुवात केली होती. मॉर्निंगस्टार इंडियाचे सह-संचालक-संशोधन व्यवस्थापक हिमांशू श्रीवास्तव म्हणाले की, नंतर अमेरिकेतील घसरणारा रुपया आणि रोखे उत्पन्न आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याज दरामुळे परदेशी गुंतवणूकदारांमध्ये निराशावादाची भावना निर्माण झाली आहे.
रुपयाच्या घसरणीनेही एफपीआयच्या पैसे काढण्याला बळ मिळाले. वीकेंड इन्व्हेस्टिंगचे संस्थापक आणि स्मॉलकेस मॅनेजर आलोक जैन म्हणाले की, सप्टेंबरमध्ये डॉलर मजबूत झाल्यामुळे गुंतवणूकदार त्याच्या सुरक्षिततेकडे वळू लागले आहेत. सध्या गुंतवणूकदार बाहेर पडून नंतर परत येण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.