नांदेड : नांदेडमधील शिवसेनेच्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आज खासदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी खासदार पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना देखील निष्ठावंत शिवसैनिकांना कुठलाही मान सन्मान दिला जात नव्हता. त्यांच्या मतांचा आदर होत नव्हता. त्यामुळे सतत होणाऱ्या अपमानास कंटाळलेल्या शिवसैनिकांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करत नांदेड जिल्ह्यातील शिवसैनिक तसेच इतर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करीत असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले. (activists and local leaders joined the shinde faction)

दरम्यान खासदार हेमंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी जिल्ह्यातील नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.

नांदेडमध्ये खळबळ! शाळेत जेवण केल्यानंतर ५० विद्यार्थ्यांच्या अचानक पोटात दुखू लागले, ५ विद्यार्थी गंभीर
या पक्ष प्रवेशामध्ये लोहा – कंधार विधानसभेचे प्रमुख मिलिंद पवार, कंधारचे शिवसेना शहरप्रमुख धनराज (बाळु) लुंगारे, लोह्याचे माजी नगरसेवक तथा युवक काँग्रेसचे विधानसभा माजी अध्यक्ष युवराज वाघमारे, शेतकरी कामगार पक्षाचे युवक जिल्हा प्रमुख मारोतराव यजगे, लोहा मार्केट कमेटिचे सदस्य बालाजी बहिरे, युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस बालाजी सपूरे पाटील, माधव मस्के, गजानन मस्के, साईनाथ करडीले, शिवानंद पुयड, शिवाजी करडीले, शिवानंद जाधव, गजानन संगेकर, बामणीजी पाटील आवातिरक, माधव पुयड, प्रभाकर पुयड, परमेश्वर पुयड, लक्ष्मण पुयड, माधव पुयड, राजू पाटील खाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला.

भीषण! देवीचा नवस फेडण्यासाठी जाताना नांदेडमध्ये पिकअप पलटला; २८ जण जखमी; १९ अतिगंभीर
सर्वांचा योग्य तो सन्मान राखला जाईल- खासदार पाटील

या प्रसंगी प्रवेश झालेल्या शिवसैनिकांचा योग्य तो मान सन्मान राखला जाईल व त्यांना कुठेही कमी पडू दिले जाणार नाही, सर्वांना सोबत आणि विचारात घेऊन विकास कामे केले जातील, असा विश्वास खासदार हेमंत पाटील यांनी शिवसैनिकांना यावेळी बोलताना दिला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर, शिवसैनिक श्याम वानखेडे यांची उपस्थिती होती.

Revenue Minister : महसूल मंत्र्यांच्या सत्कारासाठी तारेवर आकडा टाकला आणि पाहा काय केलं…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here