नांदेड : नवरात्रीच्या (Navratri 2022) आजच्या आठव्या दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते, नवरात्रीत अष्टमीला विशेष महत्व आहे. याच दिवशी अष्टभुजा स्वरूपात असलेल्या नारायणी देवीची देखील पूजा केली जाते. देवीच्या आठव्या अर्थात महागौरी रूपाची काय आहे आख्यायिका जाणून घ्या

श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचि:। महगौरी शुभं दान्महादेवप्रमोददा।।

दुर्गा मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी होय. दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुऊन जातात. भविष्यात पाप-संताप, दु:ख त्याच्याजवळ कधीही येत नाही. या देवीचा रंग पूर्णत: गोरा आहे. या गोर्‍यापराची उपमा शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलापासून दिली आहे. या देवीचे वय आठ वर्ष मानले जाते, ‘अष्टवर्षा भवेद् गौरी।’ तीचे वस्त्र आणि आभूषणदेखील श्वेत रंगाची आहेत.

महागौरीला चार भुजा आहेत. वृषभ तिचे वाहन आहे. तिच्या वरील उजव्या हातात अभयमुद्रा आणि खालील उजव्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील डाव्या हातात वर-मुद्रा आहे. महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे. आपल्या पार्वती रूपात तिने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. गोस्वामी तुळशीदास यांच्या अनुसार तिने भगवान शंकराला पती करण्यासाठी कठोर संकल्प केला होता.

या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते. तिच्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने आंघोळ घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली. तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधले जाते.देवी महागौरीचे स्मरण, पूजा भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे. आपण नेहमी तिचे ध्यान केले पाहिजे. तिच्या कृपेमुळे अलौकीक सिद्धी प्राप्त होते. महागौरी भक्ताचे संकट अवश्य दूर करते. तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते. तिला शरण जाण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केला पाहिजे. देवी महागौरीचा महिमा पुराणात वर्णिला आहे.

महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुऊन जातात. भविष्यात पाप-संताप, दु:ख त्याच्याजवळ कधीही येत नाही. या देवीचा रंग पूर्णत: गोरा आहे. या गोर्‍यापराची उपमा शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलापासून दिली आहे. या देवीचे वय आठ वर्ष मानले जाते, ‘अष्टवर्षा भवेद् गौरी।’ तीचे वस्त्र आणि आभूषणदेखील श्वेत रंगाची आहेत. दुर्गा देवीच्या अन्य स्वरुपांप्रमाणेच महागौरीचे पूजन करावे. महागौरी देवीला श्रीफळ, पुरी-भाजी, साखर फुटाणे आणि चणे यांपैकी नैवेद्य दाखवावा, असे सांगितले जाते. तसेच महागौरी देवीचे पूजन करताना गुलाबी रंगाची वस्त्रे परिधान करावीत, असे म्हटले जाते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here