Comrade Kumar Shiralkar: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कुमार शिराळकर (८०) यांचे रविवारी रात्री नाशिक येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. कॅन्सरने आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.

 

kumar-shirvalkar
म. टा. प्रतिनिधी, नाशिकः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कुमार शिराळकर (८०) यांचे रविवारी रात्री नाशिक येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. कॅन्सरने आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. रात्री साडेआठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. शिराळकर यांच्या पार्थिवावर उद्या (ता. ३) दुपारी बीटी रणदिवे हायस्कूल, मोड (ता. तळोदा, जिल्हा नंदुरबार) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

मुंबई, पुण्यात उपचार केल्यानंतर काही दिवसांपूर्वीच कॉम्रेड शिराळकर यांना नाशिकमध्ये कामगार नेते तथा ‘सिटू’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिराळकर यांच्या प्रेरणेने ‘सिटू’ संघटनेत हजारो कार्यकर्त सहभागी झाल्याचे डॉ. कराड यांनी ‘मटा’ला सांगितले.

सन २०१४पर्यंत शिराळकर यांनी पक्षाच्या राज्य आणि केंद्रीय कमिटीचे सदस्य म्हणून काम पाहिले होते. कॉम्रेड सीताराम येचुरी यांच्या नेतृत्त्वाखाली चीनला गेलेल्या भारतातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिष्टमंडळाचे ते सदस्यदेखील होते. त्यांनी हयातभर शेतकरी, ऊसतोड मजुरांसाठी योगदान दिले. संघटना बांधणी, मजुरांच्या न्याय्य हक्कांसाठीच्या लढ्याची उभारणी अशा कार्यामुळे कडवा लढवय्या अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. ‘आयआयटी’मधून उच्चशिक्षण घेतल्यानंतर शिराळकर यांनी हयातभर शेतकऱ्यांच्या विकास आणि प्रगतीसाठी लढा दिला.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here