अहमदाबाद: खेळ की शिक्षण… हा अनेकांसमोर मोठा प्रश्न असतो. त्यात दहावी-बारावीत चांगले गुण मिळाले, तर पालकांचा ओढा पाल्याच्या चांगल्या शिक्षणाकडे असतो. त्यामुळे खेळ आणि खेळाडू दोन्ही मागे पडतात. मात्र, नाशिकच्या मृण्मयी साळगावकर या रोइंगपटूने याला छेद देण्याचे काम केले आहे. रोइंगसाठी ती शाळा-कॉलेजकडे फिरकलीच नाही. रोइंगमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करण्याचा ध्यास घेतलेल्या मृण्मयीने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली.

साबरमती रिव्हर फ्रंट येथे रविवारी रोइंगच्या शर्यती झाल्या. यात २१ वर्षीय मृण्मयीने महिला एकेरीच्या सिंगल स्कलमध्ये कांस्यपदक मिळवले. तिने दोन हजार मीटर अंतर ७ मिनिटे ३३.१ सेकंदांत पूर्ण केले. मध्य प्रदेशच्या खुशप्रीतसिंगने (७ मि. २२ से.) सुवर्ण, तर उत्तर प्रदेशच्या किरण देवीने (७ मि. २९ से.) रौप्यपदक मिळवले.

मास्टर ब्लास्टरने पुन्हा भारताला जिंकवलं! नमन ओझाच्या तुफानी खेळीने India Legends विजयी

मृण्मयीला दहावीत ९२ टक्के गुण होते. मात्र, तिला सुरुवातीपासूनच खेळाची आवड होती. सुरुवातीला ती बॅडमिंटन खेळत होती. यानंतर ती काही काळ बास्केटबॉलही खेळली. तिची उंची पाहून तिच्या प्रशिक्षकांनी तिला रोइंगचा सल्ला दिला. तिचे वडीलही रोइंगपटू असल्याने मृण्मयीला प्रशिक्षकांचा सल्ला आवडला. यानंतर तिने याच खेळावर लक्ष केंद्रित करून २०१६ मध्ये रोइंगच्या स्पर्धांमध्ये प्रवेश केला. तिचे वडील नीलेश साळगावकर म्हणाले, दहावीचा तिचा शेवटचा पेपर झाला. दुपारी दोन वाजता परीक्षा संपली आणि तेथूनच तिला आम्ही रेल्वे स्टेशनला नेले. तिची हैदराबादमधील शिबिरासाठी निवड झाली होती. परीक्षेमुळे आधीच ती एक दिवस उशिराने पोहोचणार होती. त्यामुळे परीक्षा संपताच आम्ही तिला रेल्वेत बसवून हैदराबादला पाठविले. त्यानंतर परीक्षा आणि खेळ याची सांगड घालताना तिची दमछाक नको, म्हणून तिला पुढील शिक्षणासाठी कॉलेजला न पाठविण्याचा निर्णय आम्ही घेतला. अर्थात, यात तिचीही संमती होतीच. यानंतर तिने कधीही कॉलेजमध्ये पाऊल ठेवले नाही. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून ती आता शिक्षण घेत असून, ती बीएच्या तिसऱ्या वर्षाला आहे.

मृण्मयी साळगांवकर

मृण्मयीची कामगिरी

– या वर्षी पुण्यात झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळवले आहे.
– त्याचबरोबर २०१९ मध्ये झालेल्या इन्डोअर रोइंग स्पर्धेत तिने सुवर्णयश मिळवले आहे.
– २०१९ मध्ये पुण्यात झालेल्या आंतरराज्य स्पर्धेत तिला रौप्यपदक मिळाले.
– २०१९ मध्ये बँकॉक येथे झालेल्या एशियन ज्युनियर इन्डोअर अजिंक्यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले आहे.
– टोकियोत २०१९ मध्ये झालेल्या जागतिक ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेत आणि २०२१ मधील पटाया येथे झालेल्या वरिष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही ती सहभागी झाली होती.
– खेलो इंडियाची शिष्यवृत्तीही तिला मिळाली होती.

IND vs SA: सिराजच्या पुनरागमनामुळे या खेळाडूचे टेन्शन वाढले, दुसऱ्या T20 सामन्यात संघात होणार मोठे

मृण्मयी साळगांवकर

कथकची आवड

मृण्मयीला कथकचीही आवड आहे. यातील सात परीक्षा ती पास झाली आहे. याचा उपयोग तिला मानसिक तंदुरुस्तीसाठी होत असल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली, आजच्या यशाने समाधानी नाही. यापेक्षा चांगली कामगिरी मी नोंदवू शकले असते. याआधी याच स्पर्धकांविरुद्ध मी अनेकदा खेळले होते. उपांत्य फेरीतील कामगिरीने माझा आत्मविश्वास वाढला होता. त्यामुळे सुवर्णपदकाची आशा होती. अर्थात, राष्ट्रीय स्पर्धेतील या कामगिरीने माझा आत्मविश्वास वाढला आहे. उपांत्य फेरीच्या हिटमध्ये दोन हजार मीटरचे अंतर ७ मिनिटे ५४ सेकंदांत पूर्ण केले.

यंदाच्या T-20 विश्वचषकात हे ५ दिग्गज खेळाडू संघाबाहेर, जाणून घ्या कोण आहेत

विपूल-ओंकारला रौप्य

महाराष्ट्राच्या विपूल घरटे-ओंकार मस्के यांनी रोइंगमध्ये महाराष्ट्राच्या खात्यात रौप्यपदक जमा केले. कॉकलेस पेअरमध्ये या जोडीने दोन हजार मीटरचे अंतर सहा मिनिटे ४२ सेकंदांत पूर्ण केले. सैन्यदलातील विपूल दर्यापूर जिल्ह्याचा असून, ओंकार नगर जिल्ह्याचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here