Youth died while playing garba: गुजरातच्या आणंद जिल्ह्यात गरबा खेळताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. गरबा खेळत असताना २१ वर्षीय तरुणाला हृदय विकाराचा झटका आला. विरेंद्र सिंह असं मृत तरुणाचं नाव आहे. त्याच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

विरेंद्रला अस्वस्थ वाटत असल्याचं व्हिडीओच्या सुरुवातीला दिसत आहे. मात्र तरीही तो गरबा खेळत होता. गरबा खेळता खेळता तो एकाएकी जमिनीवर कोसळला. विरेंद्र सिंह राजपूतचे वडील मोरज गावातील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आहेत. विरेंद्र सिंहला मोठा भाऊ आहे. आरोग्याच्या दृष्टीनं तंदुरुस्त असलेल्या विरेंद्रचा गरबा खेळताना अचानक मृत्यू झाल्यानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
जम्मूमध्ये १९ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू
जम्मू जिल्ह्यातील बिश्नाहमध्ये जागरण मंचावर नृत्य करत असताना १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली. १९ वर्षांचा योगेश गुप्ता पार्वती आणि सतीची भूमिका साकारत होता. तो बराच वेळ नृत्य करत होता. त्यानंतर अचानक खाली कोसळला. काही वेळ तो उठलाच नाही. नृत्य पाहायला आलेल्या प्रेक्षकांनी त्याला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.