आपण पोलीस असल्याचं भासवून, तशी बतावणी करून एक जण वाहन चालकांकडून पैसे उकळत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या. त्यामुळे व्हॅगनआरमध्ये पोलिसी गणवेशात बसलेल्या व्यक्तीची टुंडला पोलीस ठाण्याचे प्रमुख राजेश पांडेय यांनी चौकशी केली. त्याला पोस्टिंग विचारण्यात आलं. त्यावर तरुण पोलिसांना थातुरमातुर उत्तर देऊन त्यांची दिशाभूल करू लागला. त्याच्याकडे ओळखपत्र मागण्यात आलं. त्यानं बोगस ओळखपत्र दाखवलं. यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच बोगस पोलीस निरीक्षक पोपटासारखं बोलू लागला.
मुकेश यादव असं बोगस पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. तो गाझियाबादच्या साहिबाबादचा रहिवासी आहे. त्याच्या व्हॅगनआर कारवर पोलिसांचं स्टिकर आहे. रात्री आपल्या एक-दोन सहकाऱ्यांच्या मदतीनं तो बाहेर पडायचा. खासगी बस, ट्रकांची तपासणी करून तो त्यांच्याकडून अवैधपणे पैसे उकळायचा. पोलिसांना त्याच्याकडे बोगस ओळखपत्र, गणवेश, आधार कार्ड, मोबाईल आणि २२०० रुपयांची रोकड सापडली. मुकेशची चौकशी सुरू आहे. त्याचे आणखी साथीदार आहेत का याचा शोध सुरू आहे.
fake police inspector, वय २३ वर्ष, वजन १५० किलो; खांद्यावर ३ स्टार; सगळे पोलीस निरीक्षक समजायचे, पण तो भलताच निघाला – firozabad 150 kg fraud police inspector arrested by up police
फिरोजाबाद: उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जनपदमध्ये एका बोगस पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. अवैध वसुली प्रकरणात त्याला तुरुंगवास घडला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं वय जवळपास १५० किलो आहे. त्याचं वय २३ वर्षे आहे. इतक्या कमी वयात निरीक्षक झाल्यानं आणि प्रकृतीमुळे त्याच्याबद्दल संशय आला. या संशयामुळेच आरोपी पकडला गेला.