मुंबई : गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप १० कंपन्यांपैकी ७ कंपन्यांचे बाजार भांडवल घसरले आहे. गेल्या आठवड्यात या सात कंपन्यांचे एम-कॅप १,१६,०५३.१३ कोटी रुपयांनी घसरले. तसेच सर्वात मोठी घसरण मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये दिसून आली.

गेल्या आठवड्यात बीएसई बेंचमार्क सेन्सेक्स ६७२ अंकांनी किंवा १.१५ टक्क्यांनी घसरला. टॉप-१९ कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, भारती एअरटेल, बजाज फायनान्स आणि एचडीएफसी गेल्या आठवड्यात तोट्यात होते. त्याचवेळी, बाजार मूल्यांकनाच्या दृष्टीने मागील आठवडा टीसीएस, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि इन्फोसिससाठी फायदेशीर ठरला.

मंदीची झळ; जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी ‘इन ॲक्शन’, सुरु करणार कर्मचारी कपात
रिलायन्सला सर्वाधिक फटका
रिलायन्स इंडस्ट्रीज, या सर्वात मौल्यवान कंपनीला गेल्या आठवड्यात बाजारमूल्यात ४१,७०६.०५ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. आठवड्याच्या शेवटी त्यांचे बाजार भांडवल १६,०८,६०१.०५ कोटी रुपये होते. त्याचवेळी, एसबीआयचे बाजार मूल्यांकन १७,३१३.७४ कोटी रुपयांनी घसरून ४,७३,९४१.५१ कोटी रुपये झाले.

कर्जदारांची झोप उडणार! SBI सह बँकांचा ग्राहकांना ‘जोर का झटका’, व्याजदरांत पुन्हा मोठी वाढ
ICICI बँकेच्या एम-कॅपमध्ये घट
खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेचे बाजारमूल्य १३,८०६.३९ कोटी रुपयांनी घसरून ६,०१,१५६.६० कोटी रुपयांवर आले. त्याचप्रमाणे, HDFC बँकेचे मूल्यांकन १३,४२३.६ कोटी रुपयांनी घसरून ७,९२,२७०.९७ कोटी रुपयांवर आले. याच कालावधीत गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसी लिमिटेडचे मूल्यांकन १०,८३०.९७ कोटी रुपयांनी घसरून ४,१६,०७७.०३ कोटी रुपये झाले.

त्याच वेळी, बजाज फायनान्सचे मूल्यांकन १०,२४०.८३ कोटी रुपयांनी घसरले आहे ४,४४,२३६.७३ कोटी रुपये झाले. भारती एअरटेलचे मूल्यांकनही गेल्या आठवड्यात ८,७३१.५५ कोटी रुपयांनी ४,४४,९१९.४५ कोटी रुपयांवर घसरले आले.

मुकेश अंबानींच्या चिरंजीवांना मोठा सन्मान, TIME च्या १०० जणांमध्ये एकटे भारतीय
कोणत्या कंपन्यांना फायदा
दरम्यान, इन्फोसिसचे मूल्यांकन या आठवड्यात २०,१४४.५७ कोटी रुपयांनी वाढून ५,९४,६०८.११ कोटी रुपयांवर पोहोचले. आणखी एक माहिती तंत्रज्ञान कंपनी TCS चे मूल्यांकन देखील ७,९७६.७४ कोटी रुपयांनी वाढून १०,९९,३९८.५८ कोटी रुपये झाले. याशिवाय हिंदुस्तान युनिलिव्हरचे (HUL) बाजार भांडवल गेल्या आठवड्यात ४,१२३.५३ कोटी रुपयांनी वाढून आता ६,३३,६४९.५२ कोटी रुपये झाले.

टॉप-१० कंपन्या कोणत्या?
बाजार भांडवलात अस्थिरता असूनही रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. त्यापाठोपाठ टीसीएस, एचडीएफसी बँक, HUL, ICICI बँक, इन्फोसिस, एसबीआय, भारती एअरटेल, बजाज फायनान्स आणि एचडीएफसी यांचा क्रमांक लागतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here