Maharashtra Politics | शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मिलिंद नार्वेकर यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. बाळासाहेबांचे सहकारी चंपासिंग थापा यांनी आम्हाला साथ द्यायचा निर्णय घेतलाय, आता ‘त्यांचे’ (उद्धव ठाकरे) सहकारीही आपल्याकडे येणार आहेत, असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले होते. तेव्हापासून मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.

हायलाइट्स:
- मिलिंद नार्वेकर रात्री अचानक शिवाजी पार्कमध्ये
- शिवसेनेच्या गोटातील चिंता वाढली होती
या ट्विटमधून मिलिंद नार्वेकर यांनी शिवाजी पार्कच्या मैदानावर सुरु असलेल्या दसरा मेळाव्याच्या तयारीची छायाचित्रे शेअर केली आहेत. तसेच नार्वेकर यांनी इथून काही अंतरावरच असलेल्या बंगाल क्लबच्या देवीचे दर्शनही घेतले. यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी दसरा मेळाव्यासाठी उभारण्यात येणाऱ्या व्यासपीठाची पाहणी केली. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांनी आपण शिंदे गटात जाणार नाही, शिवसेनेतच राहणार, असा संदेश दिल्याचे सांगितले जात आहे.
शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मिलिंद नार्वेकर यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. बाळासाहेबांचे सहकारी चंपासिंग थापा यांनी आम्हाला साथ द्यायचा निर्णय घेतलाय, आता ‘त्यांचे’ (उद्धव ठाकरे) सहकारीही आपल्याकडे येणार आहेत, असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले होते. तेव्हापासून मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. अशातच मिलिंद नार्वेकर यांनी याबाबत कोणतेही स्पष्टीकरण न दिल्याने या संभ्रमात आणखीनच भर पडली होती. परंतु, मिलिंद नार्वेकर यांनी थेट शिवतीर्थावर जाऊन तुर्तास या सर्व चर्चांना विराम दिला आहे.
मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार असल्याची कुजबूज का रंगली?
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे गेल्या काही दिवसांपासून फारसे सक्रिय नसल्याचं सांगितलं जातं. गेल्या दोन महिन्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस, श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेतल्या आहेत. गणेशोत्सव काळात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नार्वेकरांच्या घरी जाऊन त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. मिलिंद नार्वेकर यांच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंना धडकी भरवणाऱ्याच मानल्या जात आहेत. दुसरीकडे मिलिंद नार्वेकर यांची ‘मातोश्री’तील जागा रवी म्हात्रे यांनी घेतली असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकर हे दुखावले गेले असून ते शिंदे गटात जाणार असल्याचे सांगितले जात होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.