मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. यातून अनेक जण शिवसेनेतून बाहेर पडून शिंदे गटात सामील झाले. मात्र, जुने शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे पहायला मिळत आहे. दसरा मेळाव्यावरुन दोन्ही गट आता वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात बॅनरबाजी करणे, कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेणे याचा जोर आता वाढला आहे.

राज्यात शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात कार्यकर्त्यांची ये-जा सुरू आहे. त्यातच पुण्यात लागलेला हा बॅनर चर्चेचा विषय होऊ लागला आहे. त्यामुळे खरे निष्ठावंत कोण अशी परिस्थिती सद्या निर्माण होऊ लागली आहे. आदित्य ठाकरे यांचा पुणे दौरा देखील मोठ्या प्रमाणावर वाढला असून ते देखील पुण्यातील छोट्या मोठ्या कार्यक्रमाला भेटी देताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे बॅनर हे सामान्यांचे लक्ष वेधून घेत असून येणाऱ्या काळात शिवसेना नक्की कुणाची आणि खरे निष्ठावंत कोण हे पाहायला मिळणार आहे. खऱ्या निष्ठावंताची परीक्षा आता होणार आहे.
दरम्यान, ठाण्यात देखील शिंदे गटाकडून बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर शिवसेनेचे जुने वाघाचे चिन्ह वापरण्यात आलं आहे. तसेच या बॅनरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे. “शिवसेनेचा दसरा मेळावा, हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार”, अशा आशयाचे बॅनर ठाण्यातील कॅडबरी जंक्शन खोपट येथील उड्डाणपुलावर लावण्यात आला आहे. ‘एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ’, असं देखील बॅनरमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
तसेच या बॅनरवर शिवसेनेचे जुने वाघाचे चित्र असलेले चिन्ह वापरण्यात आले असून त्यात “गर्व से कहो हम हिंदू है”, असं लिहलेलं आहे. या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांचा जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो, शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. ५ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई बीकेसी मैदान येथे पार पाडणाऱ्या दसरा मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.
Hi esy.es Administrator, very same right here: Link Text