इलेक्ट्रॉनिक सोन्याची पावती
सोन्याचा हा व्यापार इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीप्ट (EGR) स्वरूपात असेल, परंतु गुंतवणूकदाराला त्याचे सोने प्रत्यक्ष स्वरूपात घ्यायचे असल्यास, ही सुविधा देखील दिली जाईल. सोन्याची नाणी आणि बारच्या आकारात प्रत्यक्ष सोने दिले जाईल. त्याचप्रमाणे घरात ठेवलेले सोनेही बीएसईवर विकता येईल. ही खरेदी अगदी शेअर खरेदी करण्यासारखी असेल. वेगळे खाते उघडावे लागणार नाही. गुंतवणूकदाराचे फक्त डिमॅट खाते असावे.
कसा होईल सोन्याचा व्यवहार?
आता डीमॅट खात्याद्वारे एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी विक्री केली जाते, त्याचप्रमाणे त्या दिवसाची सोन्याची किंमत बीएसई वर प्रदर्शित केली जाईल आणि गुंतवणूकदार त्यांच्या इच्छेनुसार सोने खरेदी करू शकतील.
जर गुंतवणूकदाराने ५० ग्रॅम सोने खरेदी केले असेल, तर स्टॉकप्रमाणेच सोन्याची गुंतवणूकही त्याच्या डीमॅटमध्ये दिसून येईल. समजा एका महिन्यानंतर गुंतवणूकदाराला सोने विकायचे असेल तर तो फक्त बीएसई वर जाऊन सोने विकण्यासाठी विक्रीचे बटण दाबेल आणि त्या दिवसाच्या सोन्याच्या दरानुसार त्याच्या खात्यात पैसे येतील. जर त्या गुंतवणूकदाराला त्याच्या खात्यात जमा केलेले सोने प्रत्यक्ष स्वरूपात घ्यायचे असेल, तर त्याला बीएसई च्या वितरण केंद्रात जावे लागेल.
ब्रिक्स इंडिया आणि सिक्वेल लॉजिस्टिक
ब्रिक्स इंडिया (BRICS India) आणि सिक्वेल लॉजिस्टिक (Sequel Logistics) सोबत गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष स्वरूपात सोने देण्यासाठी किंवा घेण्यासाठी करार केला आहे. ज्या ग्राहकांना प्रत्यक्ष स्वरुपात सोने द्यायचे किंवा मिळवायचे आहे ते या दोन्ही कंपन्यांच्या अधिकृत शाखेत जाऊन तसे करू शकतात.
एखाद्या गुंतवणूकदाराला त्याच्या घरात ठेवलेले सोने ईजीआरच्या स्वरूपात त्याच्या डीमॅटमध्ये ठेवायचे असेल, तर त्याला या दोन कंपन्यांच्या शाखेत जाऊन प्रत्यक्ष सोने जमा करावे लागेल आणि ती माहिती त्याच्या डीमॅट खात्यात नोंदवली जाईल. सोन्याच्या या व्यापारासाठी बीएसई आयातदार, बँकांमार्फतही सोने खरेदी करेल.