धुळे : शिरपूर तालुका पोलिसांनी मागील आठवड्यात सांजापाडा फत्तेपूर शिवारात वन जमिनीवर सुरू असलेल्या गांजाच्या शेतीवर कारवाई केली होती. या कारवाईतील आरोपी जामसींग जसमल पावरा याची धुळे जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. मात्र, या संशयित आरोपीने आज मध्यरात्रीच्या सुमारास धुळे जिल्हा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली.

वन जमिनीवर गांजा पिकवणाऱ्या विरोधात शिरपूर तालुका पोलिसांनी मोहीम छेडली असून गेल्या काही दिवसांपूर्वी संज्यापडा फत्तेपूर शिवारात पोलिसांनी गांजाच्या शेतीवर कारवाई करत तब्बल १५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. सांज्या पाडा फत्तेपूर शिवारात रामसिंग जसमल पावरा याच्या शेतावर पोलिसांनी धाड टाकून आमली पदार्थांविरोधी कारवाई केली होती. या कारवाईत जवळपास ४८० किलो वजनी आणि १४ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला होता.

बहिणीची छेड काढून फोटो व्हायरल करण्याची धमकी, इंजिनिअर भावाने रागाच्या भरात केलं भयंकर कृत्य
या कारवाईत शिरपूर पोलिसांनी जमसिंग पावरा याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याची धुळे जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. मात्र, आपल्यावर झालेल्या कारवाईच्या भीतीतून जामसिंग पावरा वय ७० याने धुळे जिल्हा कारागृहातच मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, या घटनेमुळे जिल्हा कारागृहात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी पंचनामा सुरू केला आहे. जामसिंग पावरा यांचा मृतदेह हा पोस्टमार्टमसाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे. पावरा यांनी आपल्यावर कारवाई झाल्याच्या भीतीतून ही आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

पुण्याहून कोकण फिरण्यासाठी गेलेल्या तरुणासोबत घडलं भयंकर, मित्रांच्या डोळ्यांदेखत झाला गायब…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here