सिंधुदुर्ग: , ठाणे, पुणे भागातून हजारो चाकरमानी दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात येतात. यंदा संसर्गाचं संकट असलं तरी एक नियमावली निश्चित करून या चाकरमान्यांच्या कोकणच्या वाटेतील विघ्न दूर व्हायला हवं, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ( Updates )

वाचा:

आगामी व मोहरम हे दोन सण शांततेत पार पडावे, यासाठी शुक्रवारी पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध अंगांनी चर्चा करण्यात आली. करोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने परजिल्ह्यातून सिंधुदुर्गात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी कशाप्रकारे नियमावली असावी, यावर बैठकीत प्रामुख्याने खल झाला. त्यात जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांना १४ दिवसांऐवजी ७ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी असायला हवा, असे मत पुढे आले. केंद्र सरकारच्या गाइडलाइन्सनुसार सध्या १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खास बाब म्हणून त्यात सूट देण्यात यावी. हा कालावधी सात दिवसांचा करण्यात यावा. तशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे करावी, असे मतप्रदर्शनही बैठकीत झाले. बैठकीनंतर खासदार यांनी त्याबाबत अधिक माहिती दिली.

वाचा:

गणेशोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्वारंटाइन कालावधी ७ दिवसांचा करण्याची खास परवानगी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून मिळवावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले. ही मागणी मान्य झाल्यास जिल्ह्यात येणारे चाकरमानी सात दिवस क्वारंटाइन राहतील आणि त्यानंतर ३ दिवस ते सार्वजनिक ठिकाणी मिसळणार नाहीत, अशी नवी नियमावली बनविण्याची सूचना करण्यात आली आहे. याशिवाय येणाऱ्या चाकरमान्यांना ई-पास सुलभ मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. येणाऱ्या चाकरमान्यांनी निघायच्या ४८ तास आधी करोना तपासणी करावी. यासाठी शासनाने मोफत अथवा एक हजार रुपयांत या चाचणीची व्यवस्था करावी, असे मुद्दे बैठकीत मांडण्यात आले आहेत. चाकरमान्यांना टोल माफी, स्वस्त दरात एसटी बसेस उपलब्ध करून गावी सोडण्याची व्यवस्था करण्याची मागणीही बैठकीत पुढे आली. या सर्व मागण्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी एकत्रितपणे महाराष्ट्र शासनाकडे पाठवीणार आहेत, असेही राऊत यांनी पुढे नमूद केले.

वाचा:

महामार्ग अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाच्या दर्जा आणि कामाच्या गतीवकून महामार्ग ठेकेदार कंपनीला आज शिवसेनेने फैलावर घेतले. आगामी गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील अडथळे दूर व्हायला हवेत, असे आज रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी संबंधितांना बजावले.
विनायक राऊत, वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज कणकवली ते कुडाळ पर्यंत मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाची पाहणी केली. महामार्ग कामामुळे पावसाळ्यात उद्भवलेल्या समस्या, कामातील त्रुटी जाणून घेत ८ दिवसांत सर्व समस्या मार्गी लावा, लोकांना महामार्गावर त्रास होता नये, अशा सूचना राऊत यांनी यावेळी केल्या. काही ठिकाणी लोकांच्या घरात पाणी घुसले आहे. शेतीत पाणी घुसले आहे. काही ठिकाणी काम निकृष्ट झाले आहे. सर्व्हिस रस्ते खराब झाले आहेत. याबाबत हायवे प्राधिकरणाचे अधिकारी, दिलीप बिल्डकॉन ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांना राऊत यांनी फैलावर घेतले. कणकवलीत रामेश्वर संकुलात दोन दिवसांपूर्वी नाल्याचे पाणी घुसले होते. तेथील नागरिकांनी आपल्या समस्या खासदाररांसमोर मांडल्या.

वाचा:

रत्नागिरी बातमी | Ratnagiri News | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here