kalyan building fire: कल्याणमधील एका रहिवासी टॉवरमध्ये रविवारी सकाळच्या सुमारास आग लागली. खडकपाडा येथे असलेल्या मोहन अल्तेजा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आगीची घटना घडली. सकाळी सव्वा सातच्या दरम्यान आग लागली. आगीपासून बचाव करण्यासाठी तिसऱ्या मजल्यावर वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबातील सात जणांनी साड्यांचा आधार घेतला.

पांडे कुटुंबातील ७ सदस्य आगीमुळे फ्लॅटमध्ये अडकले. फ्लॅटमधून बाहेर पडण्यासाठी ते बाल्कनीत आले. त्यांनी साड्यांच्या मदतीनं दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीत उड्या घेतल्या. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एक महिला लहान मुलीला तिसऱ्या मजल्यावर उभ्या असलेल्या इसमाकडे देताना दिसत आहेत. मुलीला झेलताच इसमाचा तोल गेला. तो खाली पडला. सुदैवानं तो दुसऱ्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटच्या बाल्कनीत पडला. त्यामुळे अनर्थ टळला.
इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडताच वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे लिफ्ट बंद पडल्या. त्यात दोन जण अडकले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांची सुटका केली. दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग अग्निशमन दलानं तासाभरात आटोक्यात आणली. इमारतीमधील अग्निसुरक्षा यंत्रणा बंद असल्याचं या घटनेनंतर लक्षात आलं. त्यामुळेच मदतकार्याला उशीर झाला. शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.