मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज पुन्हा एकदा असाच धमाका करण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स जिओ १५ हजार रुपयांमध्ये 4G लॅपटॉप (4G Laptop) बाजारात आणणार आहे. त्यात आधीच 4G सिम कार्ड असेल. कमी किमतीच्या जिओ फोनच्या अभूतपूर्व यशानंतर रिलायन्स जिओ आता कमी किमतीच्या लॅपटॉपमध्ये क्रांती घडवण्याच्या तयारीत आहे.
मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्सने जिओ बुकसाठी टेक बिझनेस कंपनी क्वालकॉम आणि मायक्रोसॉफ्टसोबत करार केला आहे. क्वालकॉम ही कॉम्प्युटिंग चिप्सची निर्माता आहे, तर मायक्रोसॉफ्ट ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम पुरवणारी कंपनी आहे.
भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओचे देशात ४२ कोटी ग्राहक आहेत. मात्र, जिओने याबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. रिलायन्स जिओचा १५ हजार रुपयांचा लॅपटॉप या महिन्यापासून शाळा आणि सरकारी संस्थांमध्ये मिळण्यास सुरुवात होईल. पुढील ३ महिन्यांत तो सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिला जाऊ शकतो.
जिओ फोन प्रमाणे जिओ बुकची 5G सक्षम आवृत्ती देखील येत्या काही दिवसांत लॉन्च केली जाऊ शकते. या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीने सांगितले की, ज्याप्रमाणे जिओ फोन 4G ने तंत्रज्ञानाच्या बाबतीत देशाला हादरवले होते. त्याच धर्तीवर जिओ बुक देखील क्रांती आणण्याच्या तयारीत आहे.”
गेल्या वर्षी जिओ फोन 4G लाँच केल्यानंतर १०० डाॅलरपेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोनच्या बाबतीत हा भारतातील नंबर वन ब्रँड बनला आहे. गेल्या तीन तिमाहीत १०० डाॅलरपेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोनमध्ये जिओ फोनचा २० टक्के वाटा आहे. जिओ बुकची विक्री पुढील वर्षी मार्चपर्यंत लाखोंपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, ज्यासाठी जिओने फ्लेक्स उत्पादकांसोबत करार केला आहे.