खडक फोडण्याचे काम ब्लास्ट पद्धतीने होत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक २० मिनिटे बंद केली जाईल. दुपारी १ ते २ दरम्यान २०० मीटर लांब गाड्या २० मिनिटासाठी थांबवल्या जातील, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेले सर्व्हिस रोड लवकरात लवकर सुरु व्हावेत यासाठी हे खडक फोडण्याची गरज आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर करण्यात येत आहे. तर दुपारच्या दरम्यान काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, शहरातील चांदणी चौकातील जुना पूल स्फोटकांद्वारे पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र स्फोटांमुळे हा पूल पूर्णपणे खाली कोसळला नसून तो खिळखिळा झाला . त्यानंतर पोकलेन मशीनद्वारे उर्वरित पूलाचे भाग पाडण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, या स्फोटांमुळे पूर्णपणे पूल खाली कोसळलेला नाही. मात्र, ज्या पद्धतीने स्फोट करण्याचे ठरले होते, त्या प्रमाणे स्फोट झालेला आहे. मध्यरात्रीनंतर उलटी गणती करत बरोबर १ वाजता हा स्फोट करण्यात आला.