परभणी : ऑइल मिलमध्ये सोयाबीन तेलाचे टँकर मधील वजन वाढवून चोरी करण्याचा फसला आहे. चोरांनी वजन वाढवण्यासाठी चक्क कमरेला २० किलो वजनाचे लोखंडी बेल्ट लावल्याचे ऑइल मिलमधील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे समोर आलं आहे. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास गंगाखेड पोलीस करत आहेत.

गंगाखेड शहरातील कोद्री रोडवर असलेल्या एमआयडीसी मधील महाराष्ट्र ऑइल मिलमध्ये सोयाबीन तेलाच्या टँकरचे वजन वाढावे यासाठी सहा जणांनी कमरेला २० किलो वजनाचे लोखंडी बेल्ट लावले आणि टँकर मधील १९ हजार ६२० रुपये किमतीचे १८० किलो सोयाबीन तेल चोरी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार ऑइल मिलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर सदरील चोरीचा प्रकार समोर आला आहे.

मंगळयानाने भारताला काय दिले? ‘मॉम’ नसल्याने देशाचे काय नुकसान होणार
ही चोरी चोर अशा प्रकार करायचे की, आधी मिलमधून तेलाचे टँकर भरायचं. त्यानंतर त्या तेलाचं ट्रकसहीत वजन करायचं आणि मग टँकरमधून १० किलो, २० किलो तेल गायब करायचं. त्यानंतर जेवढं तेल टँकरमधून काढलेलं असेल तेवढ्या वजनाचा लोखंडी बेल्ट कमरेला बांधायचा. अशा अजब पद्धतीने ही चोरी केली जात होती.

याप्रकरणी शरद विठ्ठलराव लोखंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये सुखविंदर सिंग, सुखा सिंग दोघेही (रा. चेंबूर मुंबई), श्रवण सिंग कालेर (रा. सुरंदर गिरी), सुखदेव सिंग हुंडल, सतनाम सिंग पाशोरा सिंग वरील चार जण (रा. सीबीडी बेलापूर नवी मुंबई) या आरोपींविरुद्ध ४७५/२०२२ कलम ३७९,५११, २४ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे सोयाबीन तेलाची हायटेक चोरी उघडकीस आली आहे.
अमिताभ बच्चन शेजारी बसले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहा काय म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here