विराट कोहलीचा चाहता असलेल्या राहुल रायला विराटची भेट घ्यायची होती. त्यासाठी त्यानं भारतीय क्रिकेट संघाचा मुक्काम असलेल्या हॉटेलमध्येच वास्तव्य केलं. तिथे त्याला कोहलीला भेटायची संधी मिळाली. त्यानं विराटसोबत सेल्फीदेखील काढला. राहुल राय गुवाहाटीचा रहिवासी आहे.

मी अतिशय नशीबवान होतो. त्यामुळे मला हॉटेलमध्ये खोली रिकामी मिळाली. मी सकाळी विराटला ब्रेकफास्ट एरियामध्ये पाहिलं, असं राहुलनं सांगितलं. अनेकदा विराटला हाक मारली. मात्र प्रत्येकवेळी सुरक्षा रक्षक मध्ये आले. माझ्याकडे विराटला भेटण्याची शेवटची संधी होती. त्यामुळे मी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना माझी प्रकृती बिघडली असून भूक लागल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला ब्रेकफास्ट एरियामध्ये जाण्याची परवानगी दिली, असा घटनाक्रम राहुलनं सांगितला.
ब्रेकफास्ट एरियामध्ये गेल्यावर मी अनेकदा विराटला आवाज दिला. त्यानं मला ब्रेरफास्ट एरियाच्याबाहेर भेटण्यास सांगितलं. मी त्याला इन्स्टाग्रामवरील फॅन पेजचा फ्रेमयुक्त कोलाज भेट म्हणून दिला. मी विराटच्या नावानं इन्स्टाग्राम पेज तयार केलं असून त्याचे १ लाख फॉलोअर्स आहेत. काही कारणास्तव विराटला फ्रेम नेणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यानं त्याच फ्रेमवर स्वाक्षरी दिली आणि सेल्फी काढला, अशी आठवण राहुलनं सांगितली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.