मुंबई : जर तुम्ही शेअर बाजारात वारंवार पैसे गुंतवले तर तुम्हाला एक्स-डिव्हिडंडची तारीख माहित असेलच. ऑक्टोबर २०२२ मध्ये कंपन्या त्यांचे तिमाही निकाल जाहीर करतात. त्याचवेळी गुंतवणूकदारांना लाभांश आणि बोनस शेअर्सची अपेक्षा असते, ज्यामुळे त्यांना कमाईची आणखी एक संधी मिळते.

ऑक्टोबर महिन्यात शेअर बाजारात सूचिबद्ध झालेल्या सुमारे पाच कंपन्या भागधारकांना लाभांशाची भेट देणार आहेत. कंपनीने बीएसई अर्थात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला देखील याबद्दल माहिती दिली आहे आणि त्याच्या लाभांशाची मुदतही जाहीर केली आहे. ऑक्टोबर महिना हा कंपन्यांचे निकाल जाहीर करण्याचा महिना आहे. कंपन्या आर्थिक वर्ष २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल सादर करतील, म्हणजे जुलै-सप्टेंबर आणि या काळात कंपन्यांना त्यांच्या भागधारकांना लाभांश आणि बोनस शेअर्सचा फायदा होऊ शकतो. या महिन्यात कोणत्या कंपन्यांचा लाभांश भागधारकांच्या खात्यात टाकणार आहेत ते पाहूया.

दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज, ‘ही’ कंपनी एका शेअरवर देणार ५ शेअर्स
कोणत्या कंपन्यांची रेकॉर्ड डेट
देशात सध्या बाजारातील अस्थिरतेचे वातावरण आहे हे आपण सर्वांना माहीत आहे, पण अशा चढ-उताराच्या स्थितीत लाभांशाच्या माध्यमातून कमाईची संधी गुंतवणूकदारांना दिलासा देऊ शकते. या बातमीत आम्ही तुम्हाला अशा पाच स्टॉक कंपन्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा एक्स-डिव्हिडंड या महिन्यात येणार आहे.

ICICI लोम्बार्ड
ICICI लोम्बार्ड कंपनीने २८ ऑक्टोबर २०२२ ही रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. हा शेअर २७ तारखेला एक्स-डिव्हिडंड होईल. कंपनीने २०२१-२२ या आर्थिक वर्षात पाच रुपये अंतिम लाभांश दिला होता.

तब्बल १६ टक्के घसरलेला शेअर तुम्हाला करू शकतो मालामाल; पाहा कोणत्या कंपनीचा आहे
आयसीआयसीआय सिक्युरिटीज
ICICI सिक्युरिटीज कंपनीने १ नोव्हेंबर २०२२ ही लाभांशाची रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली असून हा स्टॉक ३१ ऑक्टोबर रोजी एक्स-डिव्हिडंड होईल. दरम्यान, कंपनीने अद्याप लाभांशाच्या रकमेबाबत कोणतेही विधान दिलेले नाही.

एशियन पेंट्स
एशियन पेंट्सचे शेअर्स देखील ३१ ऑक्टोबर रोजी एक्स-डिव्हिडंड होणार आहेत. २० ऑक्टोबर रोजी कंपनीच्या बोर्डाची बैठक होणार आहे, ज्यामध्ये लाभांशाशी संबंधित तपशीलांवर चर्चा केली जाईल.

ऑक्टोबर महिन्यात शेअर बाजाराची कशी असेल चाल, जाणून घ्या कोणते फॅक्टर्स टाकणार प्रभाव
जय कॉर्पोरेशन
जय कॉर्प कंपनीने ०.५० रुपये लाभांश जाहीर केला आहे. या शेअरचे दर्शनी मूल्य ११ रुपये असून त्याची रेकॉर्ड डेट २१ ऑक्टोबर आहे. म्हणजेच २० ऑक्टोबर रोजी हा शेअर एक्स-डिव्हिडंड असेल. ही कंपनी आपल्या भागधारकांना अंतिम लाभांश देत आहे. कंपनीने २५ मे २०२२ रोजी लाभांश जाहीर केला होता आणि त्याची एक्स-डिव्हिडंड तारीख २० ऑक्टोबर २०२२ निश्चित केली आहे.

एंजेल वन
एंजल वन कंपनीने अद्याप लाभांशाची रक्कम जाहीर केलेली नाही, पण कंपनीने त्याची रेकॉर्ड डेट २१ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. हा स्टॉक २० तारखेला एक्स-डिव्हिडंड देईल असे अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here