पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशीधरन नायरच्या मुलानं ३० वर्षांपूर्वी बहारीनमध्ये आत्महत्या केली. नायरच्या मुलाला प्रभाकर कुरुप यांनी बहारीनमध्ये नोकरी मिळवून दिली. भारतातून बहारीनला पाठवत असताना प्रभाकर यांनी नायरच्या मुलाला चांगल्या नोकरीचा शब्द दिला. मात्र प्रत्यक्षात मुलाला वेगळीच नोकरी देण्यात आली. त्यामुळे नायरचा मुलगा तणावाखाली होता. त्यानं बहारीनमध्ये आत्महत्या केली. ही घटना ३० वर्षांपूर्वी घडली.
या प्रकरणी नायरनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तेव्हापासून न्यायालयात सुनावणी सुरू झाली. शुक्रवारी न्यायालयानं प्रभाकर यांची सुटका केली. यामुळे नायर संतापला. त्यानं शनिवारी प्रभाकर यांचं घर गाठलं. त्यांना धमकी दिली. दोघांचा वाद झाला. प्रकरण मारहाणीपर्यंत गेलं.
विमला यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. त्यावेळी नायरनं दोघांवर हातोड्यानं हल्ला केला. हल्ल्यात दाम्पत्य जखमी झालं. यानंतर नायरनं दोघांवर पेट्रोल टाकलं आणि त्यांना पेटवलं. दाम्पत्याचा आक्रोश ऐकून शेजारी जमले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दोघांना रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.